मानवजातीला जगण्यासाठी प्राणवायु आवश्यक आहे. त्याची कमतरता म्हणजेच आपला विनाश. फक्त झाडे आणि प्रवाळ प्राणवायुचा उगम आहेत.
पाण्याचा अपव्यय ही समस्या आहेच परंतु घराघरांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे जलस्त्रोतांचे होणारे प्रदुषण ही दुसरी प्रचंड मोठी पण दुर्लक्षित समस्या आहे
आपल्या दिनक्रमाची चतुःसुत्री – वापर टाळणे, वापर कमी करणे, पुनर्वापर व पुनःप्रक्रीया. लक्षात ठेवा पुनःप्रक्रीया हा शेवटचा पर्याय आहे.
वडाचे झाड (संस्कृतमध्ये वट किंवा न्यग्रोध) हे निसर्गाची शाश्वतता आणि चक्रीयतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याला येणाऱ्या पारंब्या जमिनीवर पोहोचतात आणि ‘आधारस्तंभ मुळे’ किंवा ‘सहाय्यक खोडां’मध्ये परिवर्तित होतात आणि शेवटी ही एक सतत विस्तारणारी (जैव) परिसंस्था बनते. याला ‘ जीवनवृक्ष’ असेही म्हणतात.
विचार करु!एका नवीन दृष्टीकोनासह सण साजरे करायला सुरुवात करूयात – गुढीपाडव्याच्या निमित्ताने कडुनिंब, महाशिवरात्रीला बेल वृक्ष, वट पौर्णिमेस वट वृक्ष, नारळी पौर्णिमेस नारळ, कृष्णजन्माष्टमीस पिंपळ, गणेश चतुर्थीस दुर्वा, विजयादशमीस आपटा, तुळशी विवाहास तुळस लावू.
कृती करु!आपण निसर्गदेवतेविरूद्ध ‘आत्मघातकी युद्ध’ करत आहोत हे समजण्याची वेळ आता आली आहे. कुठल्याही गोष्टीशी आपला सुसंवाद राहिलेला नाही. आपल्या बेजबाबदार वागण्याने, आपण वेगाने खुप मोठ्या अव्यवस्थेकडे जात आहोत.
हे स्वीकारण्याची वेळ आता आली आहे की आपण ‘निसर्गदेवतेला’ एक ‘गुलाम वस्तू’ बनवले आहे. आपला तिच्याबद्दलचा आदर संपला आहे. तिची पूजा करण्यापेक्षा, तिचे पोषण-दोहन करण्यापेक्षा आपण तिचे शोषण करीत आहोत.
निसर्गदेवतेविरूद्धचे हे युद्ध थांबविण्याची आणि प्रत्येक सजीव व निर्जीव वस्तूंशी शांती व सहकार्य प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. शेजारील चित्रातील कबूतर हा या शांतीचा संदेशवाहक आहे. चला त्यास निराश करू नका.
एक उत्साही प्रवासी म्हणून, प्राचीन, पवित्र जंगले आणि पर्वतांचे नैसर्गिक सौंदर्य शोधणे ही माझी आवड आहे आणि निसर्गाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. निसर्ग आणि त्याचे सौंदर्य जतन करूया.
“जगा आणि जगू द्या”, निसर्गदेवतेचे मानवाला आवाहन. सहजीवन हीच गुरुकिल्ली आहे; वर्चस्व कायमच अनर्थाकडे नेईल. आता परत देण्याची आणि येणार्या पिढ्यांसाठी निसर्ग सर्वधनाची वेळ आली आहे. चला एकत्रितपणे हे जग अधिक सुंदर बनवूया…
आपले जीवन झाडांनी पुरवलेल्या प्राणवायुवर (ऑक्सिजनवर) अवलंबून आहे. आपल्या प्रजातीला खरोखर सर्वात बुद्धीमान व उत्क्रांत म्हणवून घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम जीवनाच्या या स्त्रोताचे रक्षण करायला हवे.
पृथ्वीचा छोटासा तुकडा जैव परिसंस्थेत रूपांतरित होताना पाहणे हा एक अतिशय समृद्ध अनुभव आहे. अनुभवातून बरेच शिकलो आहे. ते एक निसर्गविद्यापीठ आहे – एक निसर्गकोश.
जर आपल्याला स्वच्छ आणि ताजी हवा, उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण आवश्यक असेल तर आपण अधिक झाडे जतन करुन वाढविली पाहिजेत.
जीवो जीवस्य जीवनम् – सृष्टीतील प्रत्येक सजीव, निसर्गत: अथवा जन्मानेच, दुसर्या कोणत्यातरी सजीवाला जगण्यसाठी मदत करतो.
“सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट” आज दुर्दैवाने स्वार्थी, आक्रमक आणि हिंसक वृत्ती दर्शविते तर “जीवो जीवस्य जीवनम्” नि:स्वार्थी, विनम्र आणि समजून घेण्याची वृत्ती. निवड आपल्या हातात आहे!