Email: [email protected]    Website Language: English / मराठी

ऋतुचक्र

वर्षाच्या सर्व महिन्यांत विविध रंगांमध्ये पृथ्वी रंगविण्याचा निसर्गाचा मार्ग!
19
Apr

ऋतुचक्र

तस्य ते [ संवत्सरस्य ] वसंतः शिरः ॥ ग्रीष्मो दक्षिणः पक्षः ॥
वर्षाः पुच्छं ॥ शरदुत्तरः पक्षः ॥ हेमंतो मध्यं ॥
                                                               - तैत्तरीय ब्राम्हण

वरील श्लोक स्पष्टपणे सूचित करतो की आपल्या पूर्वजांना केवळ सहा वेगवेगळे ऋतू माहित होते असं नाही तर ऋतू ही संकल्पना इतकी सामान्य आणि व्यापक झाली होती की त्यांनी संवत्सराला पक्ष्यांची उपमा दिली होती. वसंत डोके किंवा मुख आहे, हेमंत हे केंद्र अथवा मध्य आहे आणि वर्षा शेपटी आहे. त्या वेळी संवत्सर हा शब्दही एका वर्षासाठी पर्याय म्हणून वापरला जात होता असे दिसते.

सामान्यत: आपल्याला उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू माहित असतात. परंतु आयुर्वेद सहा ऋतूमध्ये संपूर्ण वर्षाचे विभाजन करते आणि ते वसंत-ग्रीष्म (उन्हाळा), वर्षा-शरद (पावसाळा) आणि हेमंत-शिशिर (हिवाळा) हे आहेत.

या लघुलेखातील चक्र वर्षाच्या बारा महिन्यांतील सहा ऋतूंचा अंदाजे कालावधी दर्शविते. तीन ऋतूंच्या गटास ‘अयन’ असे म्हणतात. शिशिर-वसंत-ग्रीष्म या गटास ‘उत्तरायण’ आणि वर्षा-शरद-हेमंत यांच्या गटास ‘दक्षिणायन’ म्हणतात.

समजण्यास सोपे जावे यासाठी खालील तक्ता बनविला असून तो प्रत्येक ऋतू – त्याचा मराठी महिन्यांचा गट, महत्वपूर्ण वैशिष्टय आणि इंग्रजी महिन्यांचा गट दर्शवितो.

ऋतूमराठी महिन्यांचा गट (साधारणतः)वैशिष्टयइंग्रजी महिन्यांचा गट (साधारणतः)
वसंतचैत्र-वैशाखउन्हाळ्याची सुरुवातमार्च-एप्रिल-मे
ग्रीष्मजेष्ठ-आषाढउन्हाळ्याचा कहरमे-जून-जुलै
वर्षाश्रावण-भाद्रपदपावसाळाजुलै-ऑगस्ट-सप्टेंबर
शरदअश्विन-कार्तिकपावसाळ्याचा शेवट आणि वाढती उष्णता. पानगळसप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर
हेमंतमार्गशीर्ष-पौषहिवाळ्याची सुरुवातनोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी
शिशिरमाघ-फाल्गुनथंडीची लाटजानेवारी-फेब्रुवारी-मार्च
Seasons for Kids

व्हिडिओ श्रेय: TOPScorer App

The Basics of Seasons

व्हिडिओ श्रेय: Knowledgology

टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.

ऋतूंसंबंधी आणखी माहिती या सदरात पुढे येत राहील…

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...