Project Info
Client उत्साही मुले
Skills पर्यावरण, जैवविविधता, आकाशदर्शन, इतिहास आणि संस्कृती
Website https://vanarambh.org/marathi
Project Description
रविवार, दि. २० ऑक्टोबर २०१९ रोजी, आम्ही मुलांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांना खालील विषयांची सखोल माहिती करून देण्याच्या उद्देशाने “वनारंभ निसर्गशाळा” नावाचा उपक्रम सुरू केला.
१. पर्यावरण, जैवविविधता
२. आकाशदर्शन
३. इतिहास आणि संस्कृती
या विषयांमध्ये मुलांच्या मानसिकतेवर अनंतकाळ प्रभाव टाकण्याची ताकद आहे की जे त्यांना जबाबदार नागरिक बनवतील – आपण याच जगाचे, निसर्गाचे एक भाग आहोत असा विचार करायला लावतील आणि त्यांना एकोप्याने राहण्याची आणि इतर सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंसह सहजीवन व सहकार्य प्रस्थापित करण्याची बुद्धी देतील.
अशा निसर्गशाळा थोड्याफार प्रमाणात कुठेकुठे आहेत पण त्या आता निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी शहरांतील प्रत्येक निवासी सोसायटी आणि खेड्यात सुरू करायला हव्यात.