गुढीपाडवा – लहान मुलांना समजेल अशी माहिती
गुढीचे महत्व समजून घेतल्यानंतर आपण आणखी एक महत्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे गड -किल्ले-प्राचीन मंदिरे या ठिकाणी गुढी उभारायला सुरुवात करायची.
गुढीपाडवा महोत्सव
आपण गड-किल्ल्यांवर गुढी का उभारावी?
गुढी हे विजयाचं प्रतिक आहे. शिवरायांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सर्व विजयांचं आणि त्यांनी स्वराज्यासाठी उन-वारा-पाऊस, सामाजिक-राजकीय परिस्थिती यांची पर्वा न करता पुढील पिढ्यांसाठी घेतलेल्या अपार कष्टांचं प्रतिक म्हणून व त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून.
वैयक्तिक संपर्कातून, इतिहासाच्या व सणांच्या माध्यमातून समाजाला एकत्र बांधता यावे म्हणून आणि इतिहास, राष्ट्र, संस्कृती या विषयांवरील समविचारी लोकांना एकत्र येण्यासाठी प्रमुख कारण म्हणून.
चारशे वर्षांपूर्वी गजबजलेल्या गड-किल्ल्यांवर जसे सण साजरे होत असतील त्या स्वराज्याच्या आणि आपल्या रक्षणकर्त्या वास्तूंवर पुन्हा साजरे करून किल्ल्याच्या मूक वास्तूला परत तो अनुभव देऊन वास्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून.
हे देखील वाचा: भारतीय सण, उत्सव आणि त्यांचा निसर्गाशी असलेला अतुट संबंध
व्हिडिओ श्रेय: Sonalika e-Gurukul
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.