६३ तलावांचं पुनरुज्जीवन केलं, म्हणजे नेमकं काय?
गोंदिया जिल्ह्यात तलाव आहेत पण त्यात वनस्पती, मासे नाहीत, म्हणजे तलाव मेले आहेत. त्यावर अवलंबून असणारा ढिवर समाज स्थलांतरित होऊ लागला.
ही धोक्याची घंटा लक्षात घेत शालू कोल्हे यांनी शेतीत नांगरणी करावी तशी तलावाची नांगरणी केली आणि आपल्या गावसकट ६३ तलाव पुनरुज्जीवित केले. समाजातल्या लोकांना रोजगार दिला, गावात दारूबंदी केली, कौटुंबिक हिंसा थांबवली आणि महिला सबलीकरण केले शिवाय शासनाला दखल घेण्यास भाग पाडले. बारावी शिकलेली एक महिला एवढे कार्य कसे करू शकते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर सज्ज व्हा ऐकायला या निसर्गकन्येला! डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली ही मुलाखत नक्कीच प्रेरणादायी ठरेल!
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा, जैवविविधतेचे आणि आरोग्याचे रक्षण करणारे भारतीय सण-उत्सव, ऋतुचक्र
हे देखील पहा: वनदेवी – पद्मश्री तुलसी गौडा, जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
व्हिडिओ श्रेय: Swayam Talks
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.