Sacred Animals of India
प्राचीन भारतीयांनी प्राण्यांच्या संरक्षणासाठी धार्मिक, अध्यात्मिक भावनांचा वापर केला आणि त्यांना यश आले: प्राणी वाचले.
आधुनिक भारतीयांनी प्राणी संरक्षणासाठी कायदे केले आहेत: पण त्यांना यश आलेले नाहीः एकीकडे वन्यजीव नष्ट होत असताना दुसरीकडे पाळीव जनावरांना अविश्वसनीय क्रौर्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
काही श्रद्धांना आणि निष्ठांना वेगळे सामर्थ्य आणि उंची मिळाली आहे. देवदेवतांमध्ये गणेश सर्वाधिक लोकप्रिय आहे. नंदीशिवाय शिव आणि सिंह किंवा वाघाशिवाय दुर्गा अकल्पनीय आहेत. तरीही यातून प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्रत्यक्षात काही झालेले दिसत नाही. क्रूर माहूत आणि सर्कसच्या मालकांकडून अजूनही हत्तींना डिवचले आणि टोचले जात आहे; जीवन वा मृत्यू दोन्हीमध्ये बैलाची दुर्दशा होते आहे. आणि वाघ आणि सिंह शिकारींमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
जोपर्यंत सृष्टीच्या निर्मितीचा पुरातन आदर परत येत नाही, जोपर्यंत सृष्टीच्या जैविक विविधतेबद्दल भारतात आदर पुनःप्रस्थापित होत नाही, तोपर्यंत भारतातील पवित्र प्राणी केवळ नावाने पवित्र राहतील.
And thus an elaborate mythology was evolved to protect each species and honour it. It worked for a while—for as long as good values remained important and greed was regarded to be a vice. – Nanditha Krishna, Author and Activist