11
Apr
देशी वृक्ष
0 Comment
या पुस्तकात पहिल्या भागाची, आपले वृक्ष (भाग १), सर्व वैशिष्टये आहेत. हे आणखी ६१ भारतीय मूळ वृक्ष प्रजातींचे दस्तऐवजीकरण करून भाग १ ला पुढे घेऊन जातो.
जगलांचे अनन्यसाधारण महत्व आपल्या ऋषी-मुनींना अतिप्राचीन काळापासुन समजले होते, ते आपण आज विसरलो आहोत. ' कळतंय, पण वळत नाही' अशी तरी आपली अवस्था झाली आहे, किंवा जाणूनबुजून आपण दुर्लक्ष करीत आहोत. नैसर्गिक जंगल हा हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचा परिपाक असतो. जंगल आपल्याला निर्माण करता येत नाही! निदान करणे अशक्यप्राय तरी असते. जंगलामध्ये स्थानिक वनस्पती आढळतात, 'आपले वृक्ष' असतात. नष्ट झालेल्या किंवा निकृष्ठ बनलेल्या जंगल परिसंस्थेच्या काही अंशी तर जवळपास जाणाऱ्या वनीकरणासाठी देशी झाडांची, - केवळ आपल्या वृक्षांचीच - लागवड करण्याची आवश्यकता आहे. - प्रा. श्री. द. महाजन, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि लेखक