11
Apr
आपले वृक्ष (भाग १)
0 Comment
साध्या, सरळ, मनोरंजक भाषेत सांगितलेली शास्त्रीय माहिती आणि संस्कृत वाङ्मय तसेच आयुर्वेदिक ग्रंथातील संदर्भ यांचा आगळावेगळा मनोहारी संगम हे ह्या लिखाणाचे वैशिष्ट्य. वृक्षांचे उपयोग, लागवडीविषयीचे ज्ञान आणि आढळण्याची ठिकाणे दिल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली आहे.
आपले वृक्ष - आपली झाडे म्हणजे देशी झाडे एतद्देशीय वनस्पती असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे भारतीय उपखंडात मुळच्या असणाऱ्या वनस्पती, इथल्या मातीत, हवामानात, पर्यावरणात उत्कांत झालेल्या, इथल्या निसर्गात एकरुप होऊन गेलेल्या वनस्पती. इथे देशी हा शब्द फार ताणायचा नाही, प्राकृतिक, भौगोलिक अर्थाने विचार करायचा. वनस्पतींना राजकीय सीमा समजत नाहीत! राजकीय सीमा मनुष्य निर्मित असतात, बदलतही असतात. - प्रा. श्री. द. महाजन, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि लेखक