11
Apr
भारतातील पवित्र वनस्पती
0 Comment
वनस्पतिविश्वाविषयी गाढ आत्मीयता, सखोल आणि साक्षेपी ज्ञान असणाऱ्या भारतीय परंपरेची ओळख करून देणारे पुस्तक. इतिहास, संस्कृती, साहित्य, वनस्पतिशास्त्र, औषधविज्ञान, धर्मेतिहास, आणि लोकमानस या सर्व विषयांना स्पर्श करणारे पुस्तक. वनस्पतींची स्थानिक मराठी, हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत नावे, वृक्ष-वनस्पतीशी संबंधित लोककथा, पुराणकथा, ऐतिहासिक संदर्भ, त्या वनस्पतीचे औषधी उपयोग ही माहिती या पुस्तकातून मिळते.
एके काळी आपल्या परिसरातच असणाऱ्या आणि आता दुर्मीळ झालेल्या अनेक झाजझुडुपांची ओळख नव्याने रुजवून आपल्या पर्यावरणाविषयी भान देणारे पुस्तक.
हे पुस्तक Sacred Plants of India या इंग्रजी पुस्तकांचं मराठी भाषांतर आहे.
अन्न, निवारा, चारा, लाकूड आणि इतर कितीतरी जीवनावश्यक गोष्टींचे वरदान देणाऱ्या सृष्टीच्या निर्मितीविषयी माणसाला स्वाभाविकपणे वाटणारा आदर वृक्षोपासनेद्वारे व्यक्त झाला. वृक्षांची मानवी जीवनासाठी असलेली अनेक प्रकारची उपयुक्तता जाणविल्यामुळे वृक्षांना पूजनीय मानले गेले. वृक्षांना पावित्र्य बहाल करुन प्राचीन लोकसमूहांनी त्यांच्या सामाजिक, आर्थिक, औषधी भूमिकेविषयी कृतज्ञ जाणीव सूचित केली. वृक्षांमध्ये वास करणारे देवीदेवता आणि दैवी अंश यांना प्रसन्न करण्यासाठी खुद्द वृक्षांचीच पूजा केली जायची - नंदिता कृष्णा, लेखिका आणि कार्यकर्त्या