Ahead To Nature
पर्यावरणाची समस्या आज पर्यावरणाइतकीच सर्वव्यापी झाली आहे. निसर्गाशी ‘लढा’ देऊन त्याच्यावर ‘विजय’ मिळविण्याच्या प्रयत्नात आपण त्याची खूपच हानी केली आहे. निसर्गाचं चक्र यामुळे भेदलं जात आहे.
पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मुळ आहे आपल्या मनोवृत्तीत – आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.
ही मनोवृत्ती जोवर बदलत नाही, तोवर या समस्या सुटणार नाहीत. हा बदल कसा असला पाहिजे? तो कशानं शक्य होईल? आधुनिक पाश्चात्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्वज्ञान यांच्या आधारे. या बदलची दिशा शोधणारं हे पुस्तक.
सर्व समस्या एकमेकांशी निगडीत आहेत. एकीमेकींच्या परिणामानं प्रत्येक समस्येची उग्रता प्रतिदिनी वाढत आहे. खूप गाठी बांधून गुंता व्हावा आणि एक गाठ सोडवायला जाताना इतर गाठी आणखी पक्क्या व्हाव्यात तसं काहीसं होत आहे.
आणि हा गुंता सोडवण्याची आपली रीत ही अजब आहे. बाहेरून ओढाताण करुन आपण या गाठी सोडवू पाहत आहोत! कोणीतरी गाठ सोडवायची असेल, तर बाहेरुन ओढाताण करुन ती सुटू शकत नाही - आतूनच ती सोडवावी लागते. - श्री. दिलीप कुलकर्णी, निसर्गस्नेही विचारवंत आणि लेखक
टीप: हे पुस्तक ‘निसर्गायण‘ या मराठी भाषेतील पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर आहे.