11
Apr
चैत्रपालवी
0 Comment
आपण एखाद्या माणसाला जंगलातून बाहेर काढू शकतो, परंतु जर तो त्याच्याशी एकरूप झालेला असेल तर आपण त्याच्यातून जंगल बाहेर काढू शकत नाही.
वसंत ऋतू दरम्यान जंगलाचा अनुभव इतका खास असतो की जंगल कधीच न पाहिलेलेल्या माणसाची विचारसरणी सुद्धा पूर्णपणे बदलू जाईल.
आता मी सत्तरीच्या घरात प्रवेश करतोय. आता मागे वळून पाहताना वाटत, मला असलेल्या छंदामुळे माझं जीवन किती समृद्ध झाले आहे. हे छंद जोपासण्याच्या पाठीमागं माझी अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. जंगलातली भटकंती सावकाश व डोळसपणे केली आहे. पर्वतावर हळूहळू चढताना अजूबाजूचं सृष्टीसौंदर्य पाहिलं आहे. वनविद्या सावकाश मिळाली आहे. ही विद्या प्राप्त करुन घेण्यासाठी शॉर्टकट नाही... - श्री. मारुती चितमपल्ली, वनअधिकारी आणि लेखक