Hinduism and Nature
भारतीय गृहिणी तिच्या दिवसाची सुरुवात समोरच्या दरवाजाच्या बाहेरील जागेची स्वच्छता करून आणि तांदळाच्या पिठाने काढलेल्या सुंदर रांगोळीने सजवून करतात. हे करताना आपल्या घराचे सुशोभिकरण करण्याव्यतिरिक्त, ती मुंग्यासुद्धा खाऊ घालत आहे आणि त्यांना बाहेर ठेवण्यासाठी तिला कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करण्याची गरज नाही.
जेव्हा ती स्नान करते तेव्हा ती प्रार्थना करते की हे पाणी गंगा नदीसारखे पवित्र होऊ दे, ज्याचे प्रतिजैविक गुण सिद्ध झाले आहेत.
ती सात वेळा पिंपळाच्या झाडाला फेर घालून सिंधू, वैदिक, हिंदू, बौद्ध, जैन आणि आदिवासी परंपरेला एकत्र बांधते. पिंपळ हे एक अद्वितीय झाड आहे जे हवेतील अशुद्धी चा नाश करते आणि दिवस व रात्र प्राणवायू (ऑक्सिजन) सोडते.
ती आपल्या घराच्या मध्यभागी असलेल्या पवित्र तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करते, तीला हे माहित आहे की यामुळे खोकला, सर्दी आणि ताप येण्यापासून बचाव होतो.
ती आपल्या पूर्वजांसाठी शिजवलेल्या तांदळाची एक लहान वाटी छतावर ठेवते, जी बाह्य वातावरण स्वच्छ ठेवणारे कावळे खातात.
ती फक्त लख्ख प्रकाशातच तिचे घर झाडते, कारण तिला या गोष्टीची भीती वाटते की जर तिने संध्याकाळी किंवा अंधारात साफसफाई केली तर घरात राहणारे लहान कीटक कोपऱ्यांत वा फटींत फेकले जातील किंवा त्यांना हानी पोहोचेल.
तिच्या जीवनाची प्रत्येक गोष्ट निसर्गाशी आणि वातावरणाशी आणि वैज्ञानिक पर्यावरण व्यवस्थापनाशी अत्यंत जवळून जोडलेली आहे. दुर्दैवाने संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली जे चांगले होते व जपले गेले होते ते सर्वच आधुनिकीकरण आणि विकासाच्या नावाखाली टाकले गेले आहे.
म्हणजेच, आध्यात्मिक आयाम देऊन निसर्ग संवर्धनाची भारताची प्रदीर्घ परंपरा आहे, परंतु वेगवान बदलणारे जग, वाढता भोगवाद, लोकसंख्या आणि परिणामी जमीन आणि नैसर्गिक संसाधनांवरील दबाव यामुळे आपली मूल्यव्यवस्था बदलली आहे. ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाच्या हाकेला जगातील विविध धर्मांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसादाची गरज आहे.
Hinduism has a definite code of environmental ethics. According to it, humans may not consider themselves above nature, nor can they claim to rule over other forms of life. Hence, traditionally, the Hindu attitude has been respectful towards nature. – Nanditha Krishna, Author and Activist