Email: [email protected]    Website Language: English / मराठी

सम्यक विकास

मूलभूत विकास, सर्वांगीण विकास, एकात्म विकास, एकसामायिक विकास, संतुलित विकास, शाश्वत विकास
11
Apr

सम्यक विकास

‘विकास’ ही संकल्पना सध्या केवळ ‘भौतिकवाढी’त अडकून पडली आहे – संकुचित झाली आहे. दरडोई उपभोग वा दरडोई जी.एन.पी. वाढवणं या झापडबंद रीतीनं ‘विकासा’चा आलेख चढता ठेवण्याचा सध्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या मनांवरचं ह्या संकल्पनांचं गारूड इतक बाळकट आहे की, त्यांचे व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्यांच्यावर होणारे भयंकर दुष्परिणाम जाणीपूर्वक दुर्लक्षून आपण वेगानं त्याच दिशेत पुढे जात आहोत. तिकडे अर्थशास्त्राच्या मोजपट्ट्या ‘विकास’ होत असल्याचं दाखवतात; पण प्रत्यक्ष अनुभव येत आहे तो सार्वत्रिक अधःपतनाचा – सर्वांगीण विनाशाचा.

अशा या अशाश्वत विनाशक विकासाची कारणमीमांसा करून खऱ्याखुऱ्या विकासाची दिशा शोधण्याचा हा प्रयत्न. व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्या तिन्हींची धारणा करणारा; ‘भौतिक वाढी’ला असणाऱ्या निसर्गाच्या अपरिहार्य मर्यादेचं भान ठेवून त्या मर्यादेचा आदर करणारा; जाणिवेच्या अनंत विस्ताराचा विकास अभिप्रेत असणारा असा हा ‘सम्यक् विकास’ आहे.

संकल्पना आणि व्यवहार ह्यांची सांगड घालत त्याचा ऊहापोह करणारहे पुस्तक.

विझण्यापूर्वी ज्योत मोठी व्हावी तशी ही वाढ आहे. सध्या ज्याला 'विकास' म्हटलं जातं तो चिरस्थायी किंवा शाश्वत नसून विनाशकारी आहे. व्यक्ती, समाज आणि पर्यावरण ह्या तिन्ही स्तरांवर आपण फार वेगानं सर्वनाशाच्या कड्याकडे चाललो आहोत. - श्री. दिलीप कुलकर्णी, निसर्गस्नेही विचारवंत आणि लेखक

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...