आपलं पाणी वाचवा
बालपणापासूनच आपण ऐकत आहोत की उद्योगांद्वारे होत असलेले प्रदूषण, ते दररोज सोडत असलेली रसायने आपले ओढे-नाले, नद्या यांना प्रदूषित करीत आहेत. हे नक्कीच खरे आहे! तथापि, आपल्याला माहित आहे का की आपण आपल्याच घरात दररोज बरीच रसायने वापरत असतो? आपले टूथपेस्ट्स, आंघोळीचे साबण, शैम्पू, वॉशिंग पावडर, डिश साफ करणारे साबण, मेक-अप किट्स हे या रसायनांचा प्रमुख स्रोत आहेत आणि दररोज आपण त्यांना सांडपाण्यात (ड्रेनेजच्या पाण्यात) सोडत असतो जे शेवटी मातीमध्ये मिसळतात किंवा नद्या व इतर प्रवाहांमध्ये पोहोचतात आणि त्यांना दूषित करतात. पाण्यातील जीवसृष्टीचा नाश करतात.
ही समस्या येथे थांबत नाही. समस्या चक्रीय बनते. कारण आपल्याच घरातून बाहेर पडलेले प्रदूषित पाणी नंतर शेतीसाठी वापरले जाते. त्यातील रसायने मातीत जातात जी भाज्या व इतर पिकांच्या मुळावाटे शोषली जातात. शेवटी, ते आपल्या पोटात पोहोचतात ज्यामुळे कर्करोग, कॉलरा, अतिसार, मूत्रपिंड रोग, यकृत रोग असे अनेक प्रकारचे आजार उद्भवतात.
घरगुती वापरातून रसायने टाळण्यासाठी कोणी आपल्याला येऊन थांबविण्याची गरज नाही. निर्णय पूर्णपणे आपला आहे! – आपला स्वत: चा बचाव करण्यासाठीच!
व्हिडिओ श्रेय:TutWay
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.