17
Apr
वृक्षमहात्म्य
0 Comment
अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचणीकम् I
कपित्थबिल्वाम्लकत्रयं च पन्चाम्रवापी नरकं न पश्येत ॥
- भविष्यपुराण
भविष्यपुराणात म्हटलंय की,
‘पिंपळ, कडूलिंब आणि वड यापैकी (कोणताही) एक वृक्ष,
किंवा चिंचेची दहा झाडे.
किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष,
किंवा आंब्याची पाच झाडे जो लावेल तो नरकात जाणार नाही.’
प्राचीन काळात जेव्हा लोकसंख्या खूपच कमी होती आणि निसर्ग समृद्ध होता तेव्हा त्या काळातील ऋषींनी निसर्गसंवर्धन आणि वृक्षारोपण यांचे महत्त्व ओळखले होते. त्याचबरोबर त्यांनी प्रभावीपणे झाडांच्या उपयुक्त प्रजातींचे महत्त्व पटवून दिले होते. साहित्यात इतर ठिकाणी मिळालेल्या उल्लेखांनुसार ते वृक्षारोपण (वन महोत्सव) कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करत असत जे त्यांच्या दूरदृष्टीची आणि विवेक बुद्धीची पुष्टी करते.