ऋतुचक्र
तस्य ते [ संवत्सरस्य ] वसंतः शिरः ॥ ग्रीष्मो दक्षिणः पक्षः ॥
वर्षाः पुच्छं ॥ शरदुत्तरः पक्षः ॥ हेमंतो मध्यं ॥
- तैत्तरीय ब्राम्हण
वरील श्लोक स्पष्टपणे सूचित करतो की आपल्या पूर्वजांना केवळ सहा वेगवेगळे ऋतू माहित होते असं नाही तर ऋतू ही संकल्पना इतकी सामान्य आणि व्यापक झाली होती की त्यांनी संवत्सराला पक्ष्यांची उपमा दिली होती. वसंत डोके किंवा मुख आहे, हेमंत हे केंद्र अथवा मध्य आहे आणि वर्षा शेपटी आहे. त्या वेळी संवत्सर हा शब्दही एका वर्षासाठी पर्याय म्हणून वापरला जात होता असे दिसते.
सामान्यत: आपल्याला उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू माहित असतात. परंतु आयुर्वेद सहा ऋतूमध्ये संपूर्ण वर्षाचे विभाजन करते आणि ते वसंत-ग्रीष्म (उन्हाळा), वर्षा-शरद (पावसाळा) आणि हेमंत-शिशिर (हिवाळा) हे आहेत.
या लघुलेखातील चक्र वर्षाच्या बारा महिन्यांतील सहा ऋतूंचा अंदाजे कालावधी दर्शविते. तीन ऋतूंच्या गटास ‘अयन’ असे म्हणतात. शिशिर-वसंत-ग्रीष्म या गटास ‘उत्तरायण’ आणि वर्षा-शरद-हेमंत यांच्या गटास ‘दक्षिणायन’ म्हणतात.
समजण्यास सोपे जावे यासाठी खालील तक्ता बनविला असून तो प्रत्येक ऋतू – त्याचा मराठी महिन्यांचा गट, महत्वपूर्ण वैशिष्टय आणि इंग्रजी महिन्यांचा गट दर्शवितो.
ऋतू | मराठी महिन्यांचा गट (साधारणतः) | वैशिष्टय | इंग्रजी महिन्यांचा गट (साधारणतः) |
---|---|---|---|
वसंत | चैत्र-वैशाख | उन्हाळ्याची सुरुवात | मार्च-एप्रिल-मे |
ग्रीष्म | जेष्ठ-आषाढ | उन्हाळ्याचा कहर | मे-जून-जुलै |
वर्षा | श्रावण-भाद्रपद | पावसाळा | जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर |
शरद | अश्विन-कार्तिक | पावसाळ्याचा शेवट आणि वाढती उष्णता. पानगळ | सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर |
हेमंत | मार्गशीर्ष-पौष | हिवाळ्याची सुरुवात | नोव्हेंबर-डिसेंबर-जानेवारी |
शिशिर | माघ-फाल्गुन | थंडीची लाट | जानेवारी-फेब्रुवारी-मार्च |
Seasons for Kids
व्हिडिओ श्रेय: TOPScorer App
The Basics of Seasons
व्हिडिओ श्रेय: Knowledgology
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.
ऋतूंसंबंधी आणखी माहिती या सदरात पुढे येत राहील…