दैनंदिन पर्यावरण
आजकाल प्रत्येकजण निसर्ग संवर्धन, पर्यावरण संरक्षण, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलत आहे. तथापि, या समस्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेऊन किंवा त्याबद्दल बोलून सुटणाऱ्या नाहीत कारण या समस्या तंत्रज्ञानाशी संबंधीत नसून आपल्या वर्तनाशीच निगडीत आहेत.
जगातील पर्यावरणवादी चळवळींनी एक मंत्र सांगितला आहे: विचार वैश्विक – कृती स्थानिक – प्रतिसाद वैयक्तिक!
असा वैयक्तिक प्रतिसाद कोणत्या साध्या, सोप्या कृतींमधून देता येईल? व्यक्तिगत पातळीवर प्रत्येकजण काय करू शकतो? हे सांगण्याचा एक प्रयत्न या पुस्तकात आहे.
श्रुती म्हणजे निव्वळ तत्वज्ञान आणि स्मृती म्हणजे तत्वज्ञानाच्या व्यवहारीक आचरणाचा मार्ग दाखविणारे ग्रंथ. हे पुस्तक अशा प्रकारची एक 'पार्यावरणीक स्मृती' आहे. प्रत्येक स्मृती ही काही काळानंतर कालबाह्य ठरते. पर्यावरण सुधारल्यामुळे ह्या पुस्तकातील विषयांचा ऊहापोह निरुपयोगी ठरुन हे पुस्तकही लवकर कालबाह्य व्हावं असं मला वाटतं! - श्री. दिलीप कुलकर्णी, निसर्गस्नेही विचारवंत आणि लेखक