यशाच्या गावी जाता जाता – श्री. किरण पुरंदरे
… मुक्त निसर्गशिक्षक, प्रेरक आणि लेखक.
“… आपल्याला एकादी गोष्ट करायला (छंद) का आवडते हे नाही सांगता येत आपल्याला, ते उपजत असतं किंवा असावं लागतं.”
“…खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची उलूशीच चोच
तेच दात तेच ओठ
तुला दिलं रे देवानं
दोन हात दहा बोटं”
“… सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत जंगलातला एक पाणवठा निसर्गातील वेगवेगळे जीव शेअर कसा करतात (वाटून कसा घेतात)? भांडतात का? कोणत्या वेळेला येतात? कसे पाणी पितात? एकटे येतात की समूहाने?”
“… माणसाने पक्ष्यांकडून काय काय शिकावे?
१. पक्षी आपले शरीर नेहमी स्वच्छ ठेवतात.
२. आपण आयुष्यामध्ये कर्तृत्वाची कितीही उंची गाठली तरी नेहमी आपले पाय टिटवी पक्ष्यासारखे जमिनीवर असायला पाहिजेत.
३. पक्ष्यांकडे सौंदर्य दृष्टी असते.
४. लहान पिल्लांचे पालन पोषण.
५. काहीही घडलेले नसतानाही पक्षी आनन्दाचेच गाणे गातात.
६. एकनिष्ठपणा.”
“…मोवई नावाच्या झाडाची फळे हळद्या नावाचा पक्षी खातो. त्याच्या विष्ठेतून बिया पडून लवकर रुजतात. अशी रोपे जास्त सशक्त असतात.”
“…मुले करिअर म्हणून निसर्ग , पर्यावरणाकडे बघू शकतात का?
१. मला आनंद पाहिजे की पैसा पाहिजे?
२. आपल्याला अभ्यासातून जे कळाले त्याचा निसर्गाच्या वृद्धीसाठी उपयोग केला पाहिजे.”
“… जंगलाच्या किंवा कुठल्याही नैसर्गिक संसाधनाच्या परिसरामध्ये राहणारा लोकसमूह जो असतो त्याला स्वतःच्या उपजीविकेचे दुसरे साधन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचे जंगलावरील अवलंबीत्व कमी होऊ शकत नाही.”
“… माणसे बदलणं हे भयंकर अवगड काम आहे. त्याचा संयम निंसर्गाकडून शिकलो.”
“… निसर्ग अभ्यास – निरीक्षण, निरीक्षण शब्धबद्ध करणे, वाणीद्वारे निरीक्षण लोकांपर्यंत पोहोचविणे …”
“… ध्यास, ध्यासातून येणारा अभ्यास, अभ्यासातून मिळणारा आनंद आणि हा आनंद वाटताना आपलाच आनंद वाढत जातो.”
“…कुसुमाग्रज
महाखुळे ते होते, असती,
म्हणून आपण सारे
रुपयासह पेटीत ठेवतो
दोनचार हे तारे”
हे देखील पहा: आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, घरबसल्या नागरहोळे अभयारण्याचा अविस्मरणीय अनुभव
हे देखील वाचा: वनारंभ निसर्गशाळा, रानवाटा, निसर्गवाचन
व्हिडिओ श्रेय: AVAHAN IPH
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.