मृगपक्षिशास्त्र
शौड राजाच्या आज्ञेने मंडक ग्रामवासी श्रीहंसदेवाने रचलेला मृगपक्षिशास्त्र हा पशुपक्षीशास्त्रावरील संस्कृत भाषेतील एकमेव उपलब्ध ग्रंथ आहे. प्राचीन काळी अनेक मुनींनी अभ्यास करून विविध पशू पक्ष्यांवर ग्रंथ लिहिले होते. मृग (पशू) पक्षिशास्त्र असा नावाचा अर्थ आहे. ग्रंथाची रचना करताना हंसदेवाने त्या त्या विषयावरील प्राचीन ग्रंथांचा आधार घेतला आहे.
मृगपक्षिशास्त्र या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिल्या खंडात १२७ पशूंची आणि दुसऱ्या खंडात ९७ पक्ष्यांची वर्णने दिली आहेत. अमरकोषात उल्लेखिलेल्या विविध पशुपक्ष्यांच्या पर्यायांचा अर्थ मृगपक्षिशास्त्र या ग्रंथामुळे ज्ञात होऊ शकला. हे समानार्थी शब्द नसून विविध जातीवाचक आहेत, हे निश्चितपणे माहित होऊ शकले. संस्कृत कोशांच्या इतिहासातील ही अतिशय महत्वाची घटना मानावी लागेल.
चिरं परिचयाद् बोधव्यं तदिंगितं मृदूक्तिभि: || अर्थात, [पशुपक्ष्यांविषयी ज्ञान होण्यासाठी] त्यांच्याशी अनेक वर्षे परिचय करून, गोड बोलून, त्यांचे मनोगत जाणावे. म्हणजे त्यांच्याशी माणसाचे साहचर्य असावे.
हे देखील वाचा: Sacred Animals of India