कोकणातील दिवेआगर सारख्या ठिकाणी Climate Change चा काय परिणाम होतोय?
कोकणातल्या दिवेआगारमध्ये बायोडायव्हर्सिटीवर हवामान बदलाचा परिणाम झालाय का? हे एका हौशी फोटोग्राफरच्या नजरेतूनही सुटलेलं नाही. स्थानिक फोटोग्राफर पद्मनभ खोपकर वनखात्यासोबत गेली ८ वर्षं तिथल्या पक्षांचे आणि स्थलांतरित पक्षांचे फोटो काढत आहे. पण गेल्या ३-४ वर्षांत अनेक पक्षी वाढत्या उष्मामुळे दिसणं बंद झालं आहे. हवामान बदलाचा बायोडायव्हर्सिटिवर काय परिणाम होतोय याविषयी शास्त्रज्ञही अभ्यास करत आहेत.
नोंद: व्हिडीओ मध्ये मोबाईल मधून प्ले केलेला पक्ष्याचा आवाज हा पक्ष्याला विचलीत करण्यासाठी किंवा जवळ येण्यास प्रवृत्त करण्यासाठी नसून पक्ष्याची ओळख आवाजावरुन नक्की करण्यासाठी कमी आवाजात वापरला आहे.
हे देखील पहा: जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य
व्हिडिओ श्रेय: BBC News Marathi
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.