देणं निसर्गाचं – रक्षण आरोग्याचं
निसर्गात जे ऋतुचक फिरत असते, त्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम घडतच असतात. सतत बदलणाऱ्या नैसर्गिक प्राचलांमुळे शारीरिक स्वास्थ्य बाधित होत असते; संतुलन ढळत असते.
पण, गंमत अशी की, हे ढळलेले संतुलन पुन्हा स्थापित करण्यासाठी सर्वांत जास्त साह्य करतो निसर्गच!
प्रत्येक ऋतूमधील अशा बदलांची नोंद घेणारी आणि त्या त्या काळात उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक गोष्टींच्या साह्याने संतुलन पुनःस्थापित कसे करायचे हे आयुर्वेदाच्या आधारे समजावून देणारी ही पुस्तिका: परंपरेतले शहाणपण डोळसपणे समजावून सांगणारी.
निसर्गामुळे ढळणारं स्वास्थ्याचं संतुलन,
निसर्गाच्याच साहाय्यानं त्याचं पुनःस्थापन.
पुस्तक मिळण्याचे ठिकाण: उज्ज्वल ग्रंथ भांडार, अप्पा बळवंत चौक, पुणे
हे देखील वाचा: Silent Spring