भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग ३
जैवविविधतेचे रक्षण करणारे भारतीय सण-उत्सव
आजकाल आपण Ego आणि Eco या आशयाची खालील प्रकारची चित्रे व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर अशा विविध माध्यमातून शेअर होताना पाहतो किंवा स्वतः शेअर करतो. पण या चित्रात दाखविलेला Eco प्रत्यक्षात आणायचा कसा हे मात्र कोणीच कोणाला सांगत नाही.
याच अनुषंगाने भारतीय संस्कृतीच्या एका पूर्णपणे दुर्लक्षित परंतु उत्कृष्ट पैलूचे दर्शन आज आपण घेणार आहोत – तो म्हणजे भारतीय सण, उत्सव आणि त्यांचा निसर्गाशी असलेला अतुट संबंध. Eco जीवनशैली प्रत्यक्ष कृतीत आणून दाखविणारा!
पाश्चिमात्य भौतिक विचारधारेच्या प्रवाहात वाहत जाताना आपण थोड्याफार प्रमाणात आपले सण अजूनही साजरे करत आहोत पण कोणताही सण साजरा करताना आपण क्वचितच निसर्गाचा विचार करतो आहोत. मात्र आपल्या ज्ञानी आणि अनुभवी पूर्वजांनी निसर्गातील अनेक गोष्टींचा विचार व त्यांचा नियंत्रित आणि चक्रीय उपयोग प्रत्येक सणात केला आहे. नियंत्रित आणि चक्रीय या अर्थाने की निसर्ग हा मानवासाठी अत्यावश्यक आहे, माणसाच्या आनंदासाठी, सामाजिक समन्वयासाठी सणांचे प्रयोजन आहे, तर सणांसाठी प्रत्येक वर्षी ठराविक दिवशी निसर्गातील विविध गोष्टी उपयोगात आणायच्या किंवा निसर्गातील गोष्टींचे पूजन करायचे आहे, त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करायचे आहे.
यासाठी निसर्गातील त्या त्या गोष्टी, उदाहरणार्थ विविध वनस्पती, आपल्याला सर्वप्रथम ओळखता यायला हव्या आणि त्या सर्व गोष्टी अस्तित्वातही रहायला हव्यात. सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आयुर्वेदानुसार आपल्यालाच औषधी उपयोगाच्या आहेत. तसेच निसर्गात: असलेली कोणतीही गोष्ट पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक आहे. या सर्वांचे ज्ञान असणे कधीही हितकारकच. याचाच मोठा अर्थ हा की त्या सर्व गोष्टींचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे आणि आपण निसर्ग जाणीवपूर्वक जपलाच पाहिजे हाच संदेश आपल्याला या सण, उत्सवांच्या माध्यमातून नकळतपणे मिळतो, ना की खा, प्या, नाचा आणि मजा करा!
भारतीय संस्कृतीतील सण, उत्सव आणि त्यांचा निसर्गाशी असलेला घनिष्ट संबंध आपल्या सर्वांपुढे इथे मोजक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या पूर्वजांबद्दल, संस्कृतीबद्दल कृतज्ञता वाटावी, आदर निर्माण व्हावा आणि त्यातून आपल्या हातून निसर्गरक्षणाची कृती घडावी हा यामागील उद्देश.
पुढील चक्रीय मेन्यू कसा वापराल?
सहा ऋतू आणि बारा महिन्यांतील सर्व सणांची माहिती एकाच पेजवर देऊन लेख वाचायला अवघड, रटाळ आणि डोईजड होऊ नये म्हणून आम्ही तो थोड्या नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडला आहे.
१. खालील गोलांतील कोणत्याही ऋतूवर क्लिक करा.
२. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही मराठी महिन्याच्या नावावर क्लिक करा.
३. खाली त्या महिन्यातील सणांची नावे आणि त्या सणाचा निसर्गाशी जोडलेला संबंध, निसर्गातील विविध गोष्टींच्या यादी स्वरूपात वाचायला मिळेल.
४. स्मार्टफोन स्क्रीन साईझच्या मर्यादेमुळे जर सणासोबतची माहिती दिसत नसेल तर त्या त्या सणाच्या नावावर क्लिक करा.
चैत्रातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
संवत्सरप्रतिपदा (गुढीपाडवा) | वनस्पती: १. कडुनिंब (फुले, पाने, डहाळी), २. मिरी, ३. हिंग, ४. जिरे, ५. ओवा, ६. गुलाब, ७. वेळू (बांबू), ८. आंबा (पाने, डहाळी), ९. झेंडू आणि विविध देशी झाडांची फुले, १०. तेल, ११. चंदन, १२. दवणा, १३. ऊस (गूळ, साखर (गाठी)), १४. चणे, १५. तांदूळ (अक्षता), १६. पिकलेला भोपळा, १७. मुगडाळ, १८. हरभरा डाळ (पुरण) प्राणी: १. गाय (शेण), २. बैल पक्षी: १. कोकीळ कीटक: १. मधमाशी (मध) इतर: १. लवण (मीठ) |
श्रीरामनवमी | वनस्पती: १. आले (सुंठ), २. रामफळ, ३. आंबा (पाने), ४. नारळ (श्रीफळ) प्राणी: १. वानर, २. अस्वल, ३. जटायू, ४. वराह, ५. कांचनमृग |
दोलोत्सव | वनस्पती: १. तांदूळ (अक्षता) प्राणी: १. गाय (तूप) |
गौरीउत्सव | वनस्पती: १. विविध देशी फळे, २. आंबा (कैरी), ३. हरभरे |
हनुमानजयंति | वनस्पती: १. तेल, २. शेंदूर, ३. आंबा (पाने) , ४. विविध देशी फळे प्राणी: १. वानर, २. माकड |
वैशाखातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
अक्षय्यतृतीया | वनस्पती: १. आंबा (पन्हे), २. चंदन, ३. विविध धान्य, ४. कापूस, ५. खरबूज, ६. पिंपळ |
नृसिंहजयंति | वनस्पती: १. तीळ, २. आवळे, ३. विविध धान्य प्राणी: १. गाय शक्ती: १. नृसिंह |
ज्येष्ठातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
गंगोत्सव (गंगादशहरा) | वनस्पती: १. तीळ, २. यव, ३. सक्तु, ४. आंबा आणि विविध देशी फळे प्राणी: १. गाय (घृत, तूप), २. मत्स्य, ३. बेडूक, ४. मगर, ५. इतर जलचर पक्षी: १. हंस, २. क्रौंच नद्या: १. गंगा, २. कृष्णा, ३, वेण्णा, ४. गोदावरी, ५. नर्मदा ६. यमुना |
वटसावित्री / वट पौर्णिमा | वनस्पती: १. वड, २. चंदन, ३. विविध देशी झाडांची फुले, ४. तुळस, ५. नारळ (खोबरे), ६. खारीक, ७. बदाम, ८. विविध देशी फळे प्राणी: १. रेडा, २. गाय (पंचामृत) कीटक: १. मधमाशी (मध) |
आषाढातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
महाएकादशी / देवशयनी एकादशी | वनस्पती: १. आवळा, २. धात्री, ३. तुळस, ४. विविध देशी फळे, ५. विविध देशी झाडांची फुले |
चातुर्मास | वनस्पती: १. दूर्वा, २. तांदूळ (भात), ३. मूग, ४. जव, ५. तीळ, ६. मटार (वाटाणे), ७. गहू, ८. लवण (मीठ - समुद्रातील), ९. फणस, १०. आंबा, ११. नारळ (श्रीफळ), १२. केळी प्राणी: १. गाय (दूध, दही, तूप) |
गुरुपौर्णिमा | वनस्पती: १. औदुंबर |
श्रावणातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
नागपंचमी | वनस्पती: १. दूर्वा, २. चंदन, ३. केवडा, ४. सर्पांचे निवास असलेले विविध वृक्ष, ५. तांदूळ/ज्वारी (लाह्या), ६. हरभरा, ७. रक्तचंदन, ८. हळद प्राणी: १. नाग, २. गाय (दूध, दही, तूप), ३. इतर प्रकारचे साप नद्या: १. यमुना |
मंगळागौरी | वनस्पती: १. नारळ (श्रीफळ), २. आघाडा (पाने), ३. मोगरी, ४. दूर्वा, ५. हरभरे, ६. माका (पाने), ७. बेल, ८. शमी (पाने), ९. विड्याची पाने, १०. डोरली (पाने), ११. गहू, १२. खोबरे, १३. खारीक, १४. बदाम, १५. गूळ, १६. पेरू १७. सुवासिक तेल, १८. मुगडाळ, १९. जिरे, २०. तीळ, २१. चमेली (पाने), २२. बोरी (पाने), २३. धोत्रा (पाने), २४. तुळस, २५. कण्हेरी (पाने), २६. रुई (पाने), २७. अर्जुनसादडा (पाने), २८. विष्णुकांत (पाने), २९. जाई (पाने), ३०. शेवंती (पाने), ३१. डाळिंब (पाने) प्राणी: १. गाय (दूध, दही, तूप) कीटक: १. मधमाशी (मध) |
शीतला सप्तमी | वनस्पती: १. काकडीचे पान |
श्रावणी पौर्णिमा | वनस्पती: १. चंदन प्राणी: १. गाय (दूध, पंचगव्य) |
पोवती पौर्णिमा | वनस्पती: १. कापूस, २. वेळू प्राणी: १. गाय (दूध, पंचगव्य, धूप), २. नाग |
नारळी पौर्णिमा | वनस्पती: १. नारळ (श्रीफळ), २. तांदूळ, ३. पांढऱ्या मोहऱ्या शक्ती: १. समुद्र |
श्रीकृष्णजन्माष्टमी/गोकुळाष्टमी | वनस्पती: १. आले (सुंठ), २. तांदूळ (पोहे), ३. नारळ (श्रीफळ) प्राणी: १. गाय (दही, दूध, लोणी), २. नाग, ३. पर्वत |
पिठोरी अमावस्या | वनस्पती: १. हरभरा |
पोळा (वृषभोत्सव) | वनस्पती: १. हरभरा, २. पळसाच्या झाडाची साल किंवा मूळी प्राणी: १. बैल, २. नंदी, ३. गाय इतर: १. हिंगुळ |
भाद्रपदातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
हरतालिका | वनस्पती: १. बेल, २. दूर्वा, ३. केना, ४. रुई, ५. तुळस, ६. सीता अशोक (पाने), ७. आवळी (पाने), ८. दुर्वांकुर. ९. कण्हेरी (पाने), १०. कदंब (पाने), ११. ब्राम्ही (पाने), १२. धोत्रा (पाने), १३. आघाडा (पाने), १४. बेल (पाने), १५. चाफा (फुले), १६. केवडा (फुले), १७. कण्हेरी (फुले), १८. बकुळ (फुले), १९. धोत्रा (फुले), २०. कमळ (फुले), २१. शेवंती (फुले), २२. जास्वंद (फुले), २३. मोगरा (फुले), २४. सीता अशोक (फुले) प्राणी: १. गाय (दही, दूध, तूप) कीटक: १. मधमाशी (मध) इतर: १. नदी, २. वाळू, ३. माती |
गणेशचतुर्थी | वनस्पती: १. दूर्वा, २. तांदूळ (अक्षता, मोदक), ३. चंदन, ४. बाजरी, ५. ऊस (गूळ), ६. शेंदूर, ७. तुळस, ८. केतकी, ९. शमी (पाने), १०. आघाडा, ११. नारळ (श्रीफळ, खोबरे), १२. तीळ, १३. खारीक, १४. बदाम, १५. लाल कमळ, १६. मंदार (फुले), १७. चाफा (फुले), १८. केवडा (फुले), १९. गोकर्ण (फुले), २०. जाई (फुले), २१. जास्वंद (फुले), २२. शेवंती (फुले), २३. गुलाब (फुले), २४. पारिजातक (फुले), २५. मोगरी (पाने), २६. माका (पाने), २७. बेल (पाने), २८. पांढऱ्या दूर्वा (पाने), २९. बोरी (पाने), ३०. धोत्रा (पाने), ३१. डोरली (पाने), ३२. कण्हेर (पाने), ३३. रुई (पाने), ३४. अर्जुनसादडा (पाने), ३५. विष्णुकांत (पाने), ३६. डाळिंब (पाने), ३७ देवदार (पाने), ३८. पांढरा मारवा (पाने), ३९. पिंपळ (पाने), ४०. जाई (पाने), ४१. केवडा (पाने), ४२. अगस्तिपत्र (पाने) प्राणी: १. गाय (तूप, पंचामृत), २. हत्ती, ३. उंदीर इतर: १. अबीर २. माती |
ऋषिपंचमी | वनस्पती: १. आघाडा, २. हळद, ३. सुपारी, ४. कंदमूळे, ५. तांदूळ (अक्षता), ६. तेरडा प्राणी: १. गाय (गोमय, पंचगव्य), २. बैल नद्या: १. गंगा इतर: १. तलाव, २. विहीर, ३. माती |
ज्येष्ठागौरी / दुर्गाष्टमी | वनस्पती: १. दूर्वा, २. आघाडा, ३. विविध धान्य, ४. नारळ (खोबरे), ५. खारीक, ६. केवडा प्राणी: १. गाय (दूध, दही), २. वाघ, ३. सिंह |
वामनद्वादशी / ओणम (मलबार) | वनस्पती: १. विविध देशी झाडांची फुले प्राणी: १. गाय (दूध, दही) |
अनंतचतुर्थी | वनस्पती: १. दर्भ (कुश), २. दूर्वा, ३. आघाडा इतर: १. रेशीम दोरा |
महालय पक्ष / पितृपक्ष | वनस्पती: १. दूर्वा, २. आघाडा, ३. विविध देशी झाडांची फुले, ४. तुळस, ५. शाकभाज्या प्राणी: १. गाय |
अश्विनातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
नवरात्र महोत्सव | वनस्पती: १. विविध देशी झाडांची फुले, २. शेंदूर, ३ बाजरी, ४. नारळ (श्रीफळ), ५. विड्याची पाने, ६. सप्तधान्ये (जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे), ७. दूर्वा, ८. तांदूळ (अक्षता), ९. सुपारी, १०. लिंबू इतर: १. माती, २. भस्म |
विजयादशमी (दसरा) | वनस्पती: १. झेंडूची फुले, २. तिळाची फुले, ३ आंबा (पाने), ४. आपटा, ५. शमी, ६. बाजरी (पाने), ७. जोंधळ्याची पाने, ८. गव्हाचे रोप, ९. सुपारी, १०. मंदार वृक्ष, ११. भाताचे लोंगर, १२. गवत पेंढी, १३. तांदूळ (अक्षता) प्राणी: १. हत्ती, २. अश्व (घोडा), ३. धेनु (गाय), ४. बैल |
कोजागरी पौर्णिमा | वनस्पती: १. तांदूळ (अक्षता, पोहे), २. खीर, ३. नवीन पिकविलेले धान्य, ४. नारळ (पाणी) प्राणी: १. गाय (दूध, दही, लोणी), २. बकरी (दूध, दही, लोणी) शक्ती: १. चंद्र |
वसुबारस | प्राणी: १. गाय, २. वासरू, ३. म्हैस |
धनत्रयोदशी | वनस्पती: १. कडुनिंब (पाने), २. ऊस (साखर), ३. गहू (कणिक) |
नरकचतुर्दशी | वनस्पती: १. तीळ तेल, २. आघाडा, ३ दुधी भोपळा, ४. टाकळा, ५. कारंटे/कारीट इतर: १. मातीचे ढेकूळ |
लक्ष्मीपूजन | वनस्पती: १. आले (सुंठ चूर्ण), २. लवंग, ३. वेलची, ४. ऊस (साखर, गूळ, बत्तासे), ५. कोथिंबीर (धने), ६. साळीच्या लाह्या प्राणी: १. गाय (खवा) |
कार्तिकातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
बलिप्रतिपदा | वनस्पती: १. तांदूळ (खीर), २. दूर्वा, ३. विविध देशी झाडांची फुले, ४. चंदन प्राणी: १. गाय (शेण), २. वासरू शक्ती: १. गोवर्धन (पर्वत) |
दीपावली पाडवा | वनस्पती: १. आंबा (पाने) |
तुलसीविवाह | वनस्पती: १. तुळस, २. आवळा, ३. मालती, ४. लाह्या, ५. कुरमुरे, ६. ऊस, ७. चिंच ८. विविध देशी झाडांची फुले |
धात्रीपूजन | वनस्पती: १. आवळी |
वैकुंठचतुर्दशी | वनस्पती: १. तुळस, २. कमळ, ३. रुद्राक्ष इतर: १. गोपीचंदन, २. भस्म |
त्रिपुरी पौर्णिमा/त्रिपुरारी पौर्णिमा | वनस्पती: १. कोहळा, २. कापूस |
मार्गशीर्षातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
चंपाषष्ठी | वनस्पती: १. हळद, २. वांगे, ३. आंबा (पाने), ४. कांदा प्राणी: १. श्वान (कुत्रा) |
श्रीदत्तजयंती | वनस्पती: १. औदुंबर (उंबर) प्राणी: १. श्वान (कुत्रा), २. कामधेनू (गाय) |
पौषातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
मकरसंक्रमण | वनस्पती: १. तीळ, २. तांदूळ (अक्षता), ३. गहू, ४. कापूस, ५. हळकुंड, ६. जिरे, ७. तेल, ८. ऊस (गूळ, साखर, पेरे), ९. खजूर, १०. बोरं, ११. मटार, १२. गाजर, १३. शेंगा, १४, हरभरा, १५. आयुर्वेदिक वनस्पती (उटणे) प्राणी: १. गाय (घृत, तूप), २, अश्व (घोडा) शक्ती: १. समुद्र (स्नान), २. नदी (स्नान), ३. सूर्य इतर: १. लवण (मीठ) |
माघातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
वसंतपंचमी | वनस्पती: १. वेलदोडे, २. मिरे, ३. ऊस (गूळ), ४. मुगडाळ, ५. आंबे (पन्हे), ६. अननस, ७. केळी |
रथसप्तमी | वनस्पती: १. रुई, २. बोरं, ३. तुळस, ४. सुपारी, ५. विविध देशी झाडांची लाल फुले प्राणी: १. गाय (दूध, गोवऱ्या), २. अश्व (घोडा) शक्ती: १. सूर्य |
महाशिवरात्र | वनस्पती: १. बिल्व (बेल) प्राणी: १. मृग (हरीण), २. श्वान (कुत्रा) |
फाल्गुनातील सण | सणाचा निसर्गाशी असलेला संबंध |
---|---|
फाल्गुनोत्सव | वनस्पती: १. शेंदूर, २. गुलाल, ३. चंदन, ४. नवीन धान्य इतर: १. अबीर |
होळी | वनस्पती: १. गुलाल, २. गवत, ३. वाळलेली लाकडे, ४. आंबा, ५. माड (मोठे पान ), ६. सुपारी (फांदी). ७. एरंड (फांदी), ८. केळ (खोंड), ९. बाभूळ (फांदी), १०. लिंबोणी (फांदी), ११. भेंडा, १२. नारळ (श्रीफळ), १३. पपनस प्राणी: १. गाय (गोवऱ्या, दूध, तूप) |
वर दिलेल्या सणनिहाय यादी व्यतिरिक्त खालील गोष्टी देखील जवळपास प्रत्येक सण आणि उत्सवासाठी आपण उपयोगात आणतो.
हळद, कुंकू, विड्याची पाने, सुपारी, ऊस (गूळ, साखर), तांदूळ (अक्षता, रांगोळी), गुलाल, शेंदूर, अबीर, गंध (चंदन, सफेद चंदन, अष्टगंध, इत्यादी), आंबा (पाने, फळ) , नारळ (श्रीफळ), पाणी, कपूर, लवण (मीठ), केळी (पाने, खोंड, फळे), तेल (दिव्याचे, सुवासिक), अग्नी, कापूस, धूप, उदबत्ती, अगरबत्ती (अगर झाड), शंख.
वरील विविध तक्त्यांत पाहिल्याप्रमाणे, सण साजरे करत असताना आपण अनेक प्रकारची झाडे, प्राणी, पक्षी, कीटक, निसर्गातील पवित्र शक्ती (नदी, पर्वत, सूर्य, चंद्र, अग्नी, इत्यादी) यांचे पूजन करतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. यामुळे सहाजिकच या सर्व गोष्टींबद्दल आदराची, आपुलकीची, जबाबदारीची भावना निर्माण होते.
भारतीय सण-उत्सव, ऋतू आणि आपले आरोग्य
विशेष म्हणजे प्रत्येक सणाला विचारात, उपयोगात घेतल्या गेलेल्या गोष्टी या त्या त्या ऋतूत त्या त्या महिन्यात निसर्गतः उपलब्ध असतात. त्यायोगानें त्या ऋतूत, त्या महिन्यात काय खावे काय नाही याचे यथायोग्य मार्गदर्शन सुद्धा सणांच्या माध्यमातून मिळते.
प्रत्येक ऋतूमध्ये मानवी शरीर विशेषतः चयापचय प्रक्रिया वेगळ्या स्तरावर असते, उदाहरणार्थ, चातुर्मासाच्या चार महिन्यांच्या काळात चयापचय प्रक्रिया शिथिलपणे काम करते त्यामुळे चातुर्मासाची योजनाच अशी आहे की या काळात कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या नाही याचे स्पष्ट मार्गदर्शन मिळते. तीच गोष्ट हिवाळ्याची – शरीरात उष्मा निर्माण होईल अशा प्रकारच्या अन्नाची योजना या काळात केली आहे.
ऋतूचक्राची मराठी आणि इंग्रजी महिन्यांनुसार थोडक्यात उजळणी
खालील कोणत्याही ऋतूवर क्लिक केल्यावर ढोबळमानाने त्या ऋतूत आहार कोणता असावा आणि रोजच्या वापरात कोणत्या कोणत्या गोष्टी असाव्यात (दिनचर्या आणि ऋतुचर्या) याची थोडक्यात माहिती मिळेल. यातील वर्ज्य-अवर्ज्य गोष्टी या फक्त मार्गदर्शक असून त्या ऋतूत निसर्गात: उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आणि तेंव्हा सर्वसाधारण मानवी प्रकृतीत होणाऱ्या बदलांशी संबंधित आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या कफ, वात, पित्त, इत्यादी प्रवृत्तीनुसार तिच्या आहाराला आयुर्वेदानुसार आणखी नियम आणि बंधने लागू होऊ शकतील.
वसंत | अवर्ज्य (काय समाविष्ट करा?) | वर्ज्य (काय समाविष्ट करु नका?) |
---|---|---|
चैत्र: | १. एरंडाचे पान, २. कांदा (कच्चा), ३. केशर (कमी प्रमाणात), ४. पळस, ५. पांगारा, ६. पारिजातक, ७. कैरी, ८. उटणे, ९. लिंबू, १०. द्राक्ष, ११. कलिंगड, १२. काकडी, १३. चिबूड, १४. वाळूक, १५. जाम/जाम्ब फळ, १६. बेलफळ सरबत, १७. कच्ची करवंद, १८. कोकम १९. मीठ, २०. साखर, २१. ज्वारी, २२. नाचणी, २३. जिरे, २४. धने, २५. पांढरा कांदा (कच्चा), २६. कडुनिंब, २७. आवळा, २८. आंघोळीसाठी तांब्याच्या भांड्यात सूर्याच्या ऊर्जेने तापविलेले पाणी, २९. पिण्याचे पाणी तांबे, पितळ भांड्यात किंवा माठात साठविणे, ३०. सुती कपडे, ३१. व्यायाम - मध्यम | १. अंगाला तेल, २. बर्फ, ३. मोहरी, ४. शीतपेये (कोल्ड्रिंक्स), ५. दही |
वैशाख: | १. मोगरा, २. दवणा, ३. मरवा, ४. वाळा, ५. जिरे, ६. गूळ, ७. गूळ वडी, ८. बत्तासे, ९. साखरफुटाणे, १०. गुढीपाडव्याच्या गाठी, ११. गुळंबा, १२. सुधारस, १३. कोहळा, १४. कैरी डाळ, १५. कैरी पन्हे, १६. मोड आलेले हरभरे, १७. लिंबू, १८. कोकम, १९. कच्च्या करवंदांचे सरबत, २०. पिकलेल्या काजू बोंडांचे सरबत, २१. उसाचा रस (बर्फ न टाकता), २२. शहाळ्याचे पाणी, २३. धने, २४. तुळस बी, २५. सब्जाचे बी, २६. तुळस आणि बेलाच्या पानांचा काढा, २७. कांदा (कच्चा), २८. कलिंगड, २९. काकडी, ३०. चिबूड, ३१. वाळूक, ३२. जाम/जाम्ब फळ, ३३. ताडगोळे, ३४. पिकलेली करवंद, ३५. जांभूळ, ३६. फणस, ३७. रायवळ आंबा, ३८. ताक, ३९. जलजिरा, ४०. आंघोळीसाठी तांब्याच्या भांड्यात सूर्याच्या ऊर्जेने तापविलेले पाणी, ४१. सुती कपडे, ४२. व्यायाम - मध्यम | १. तळकट पदार्थ, २. मसालेदार पदार्थ, ३. चटकदार पदार्थ, ४. हापूस आणि इतर कलमी आंबे, ५. शीतपेये (कोल्ड्रिंक्स), ६. दही, ७. आईस्क्रीम, ८. अंगाला तेल, ९. बर्फ, १०. मोहरी |
ग्रीष्म | अवर्ज्य (काय समाविष्ट करा?) | वर्ज्य (काय समाविष्ट करु नका?) |
---|---|---|
ज्येष्ठ: | १. दूध (गाय, शेळी), २. ताक (साखर, मीठ घालून), ३. लोणी, ४. पियुष, ५. तूप, ६. दह्याची निवळ, ७. भेळ (कैरी, कांदा, टोमॅटो, चिंच आणि गूळ घालून), ८. दडपे पोहे (कैरी, कांदा घालून), ९. रायवळ आंबे, १०. कोकम, ११. कलिंगड, १२. टरबुज, १३. ताडगोळे, १४. जाम/जाम्ब फळ १५. करवंद, १६. जांभळे, १७. फणस, १८. अननस, १९. कैरीचे लोणचे, २०. उटणे, २१. चंदन, वाळा, नागरमोथा पावडर (घाम येणाऱ्या जागी लावण्यासाठी), २२. सुगंधी अत्तर, २३. सुगंधी फुलांचे गजरे, २४. गुलाबपाणी, २५. सुती कपडे, २६. आंघोळीसाठी तांब्याच्या भांड्यात सूर्याच्या ऊर्जेने तापविलेले पाणी, २७. व्यायाम - अत्यल्प | १. दही, २ म्हशीचे दूध, ३. आईस्क्रीम, ४. शीतपेये (कोल्ड्रिंक्स), ५. रेशमी, पॉलीएस्टर कपडे, ६. रासायनिक पावडर (घाम येणाऱ्या जागी लावण्यासाठी) |
आषाढ: | १. कंद, २. पालेभाज्या (रानभाज्या) - रानअळू (तेरे), टाकळा, भारंगी, तांदुळजा, घोळ, ३. कुड्याच्या शेंगांची भाजी, ४. कुड्याच्या फुलांची भाजी, ५. अननस, ६. तळलेले पण पचायला हलके पदार्थ - तांदूळ, साबुदाण्याच्या पापड्या, ७. भाजलेल्या गरम भुईमुगाच्या शेंगा, ८. मोहरी, ९. ओवा, १०. मेथ्या, ११. तूप, १२. गूळ, १३. सुंठ चूर्ण आणि गूळ गोळ्या, १४. कुळीथ, १५. व्यायाम - अत्यल्प | १. करवंद, २. जांभळं, ३. आंबे, ४. फणस, ५. कांदा, ६. लसूण, ७. वांगे, ८. हरभरा, ९. वाटाणे, १०. बटाटा, ११. भजी |
वर्षा | अवर्ज्य (काय समाविष्ट करा?) | वर्ज्य (काय समाविष्ट करु नका?) |
---|---|---|
श्रावण: | १. पडवळ, २. दोडके, ३. कारली, ४. भेंडी, ५. गवार, ६. लाह्या (तांदूळ), ७. तांदूळ - मुगडाळ खिचडी, ८. भाजलेले पदार्थ - ज्वारीच्या लाह्या, फुटण्याचे डाळे, ९. फोडणीचे चुरमुरे, १०. फोडणीच्या लाह्या, ११. मोड आलेली कडधान्ये, १२. भाजून शिजवलेली कडधान्ये (मोड न आणलेली), १३. पुरणपोळी - हरभरा डाळ, गूळ, १४. तूप, १५. दूध, १६. नारळी भात, १७. ओल्या नारळाच्या करंज्या, १८. दही, १९. डाळे, २०. व्यायाम - हलका | १. साबुदाणा खिचडी, २. शेंगदाणे, ३. तळलेले पदार्थ, ४. इडली-दोसा, ५. ढोकळा, ६. पाव, ७. टोस्ट, ८. खारी, ९. केक |
भाद्रपद: | १. माका, २. बेल, ३. तुळस, ४. दूर्वा, ५. आघाडा, ६. शमी, ७. मालती, ८. केवडा, ९. कण्हेर, १०. जाई, ११. मरवा, १२. रुईच्या पानावरील मध चाटण, १३. उकडीचे मोदक - नारळ, गूळ, तांदुळपीठ, १४. परसबागेत पिकवलेले वरी, नाचणी, पडवळ, दोडका, अळू, माठ, भेंडी, १५. शेपू, १६. भाकरी, १७. घोसाळ्याची भाजी, १८. चटण्या, १९. कोशिंबिरी, २०. केळी, २१. पेरू, २२. चिकू, २३. सफरचंद, २४. पपई, २५. पपनस, २६. चिबूड, २७. तांदळाच्या रव्याची खीर, २८. भाजणीचे (१६ धान्ये) वडे, २९. दूध (म्हैस, गाय, शेळी), २९. बागकाम, ३०. व्यायाम - हलका | - |
शरद | अवर्ज्य (काय समाविष्ट करा?) | वर्ज्य (काय समाविष्ट करु नका?) |
---|---|---|
अश्विन: | १. आपटा, २. दूध, ३. तूप, ४. दुधी भोपळा - भाजी, खीर, हलवा, ५. पडवळ, ६. घोसाळे, ७. काकडी, ८. आमसूल, ९. आवळा, १०. सोलकढी, ११. डाळिंब, १२. काजू, १३. बदाम, १४. पिस्ते, १५. जायफळ, १६. वेलदोडा, १७. रक्तमोक्षण/रक्तदान, १८. व्यायाम - मध्यम | १. लोणची, २. पापड |
कार्तिक: | १. दूध, २. तूप, ३. धने. ४. गूळ, ५. कोथिंबीर, ६. अभ्यंगस्नान, ७. तीळ तेल, ८. उटणे, ९. १८ धान्यांची भाजणी, १०. चकल्या, ११. कडबोळी, १२. करंज्या, १३. शंकरपाळी, १४. लाडू, १५. अनारसे, १६. तुळस, १७. आवळा, १८. चिंचा, १९. कांदा, २०. वांगे, २१. हरभरा, २२. वाटाणे, २३. व्यायाम - मध्यम | - |
हेमंत | अवर्ज्य (काय समाविष्ट करा?) | वर्ज्य (काय समाविष्ट करु नका?) |
---|---|---|
मार्गशीर्ष: | १. बदाम, २. शेंगदाणे, ३. उडीदडाळ - भिजवलेली डाळ, आमटी (घुटे), मेदूवडे, ४. इडली-दोसे, ५. बाजरीची भाकरी, ६. वांगे, ७. गूळ, ८. तीळ, ९. कारळे, १०. करडई, ११. मिश्र डाळींच्या भाजणीचे वडे, १२. भजी (थोड्या प्रमाणात), १३. तूप, १४. तेल, १५. डिंक लाडू, १६. अळीव, ओला नारळ, गूळ - लाडू, १७. गाजर, १८. पावटा, १९. घेवडा, २०. कोबी, २१. फ्लॉवर, २२. आवळा - कच्चा, सरबत, च्यवनप्राश, मोरावळा, आवळा सुपारी, २३. अभ्यंगस्नान - तेल, उटणे, शिकेकाई, रिठा, डाळीचे पीठ, त्रिफळा चूर्ण, २४. तैल मर्दन, २५. व्यायाम - भरपूर | १. नाचणी, २. ज्वारी |
पौष: | १. तेलाची फोडणी दिलेली खिचडी, २. तूप, ३. बाजरीची भाकरी, ४. लोणी, ५. वांग्याची भाजी, ६. तीळ, ७. गूळ, ८. खारीक, ९. खोबरे, १०. बदाम, ११. पिस्ते, १२. काजू, १३. खसखस, १४. डिंकलाडू, १५. तैल स्नेहन, १६. उटणे, त्रिफळा चूर्ण, शिकेकाईने अंघोळ, १७. तीळतेल, १८. दूध, १९. लाल बोरं, २०. व्यायाम - भरपूर | - |
शिशिर | अवर्ज्य (काय समाविष्ट करा?) | वर्ज्य (काय समाविष्ट करु नका?) |
---|---|---|
माघ: | १. काळे कपडे, गडद कपडे, २. चुरमुरे, ३. कच्चे गाजर, ४. ऊस, ५. बोरं, ६. हलवा, ७. हरभऱ्याचे घाटे, ८. आवळा - कच्चा, मोरावळा, च्यवनप्राश, आवळा सुपारी, ९. पेरू, १०. चिकू, ११. सफरचंद (कमी प्रमाणात), १२. कच्चे बीट, १३. कच्चा मुळा, १४. कोबी, १५. फ्लॉवर, १६. नोलकोल (नवलकोल), १७. ओला वाटाणा, १८. ओला हरभरा, १९. वांगे, २०. पावटा, २१. बाजरीची भाकरी, २२. हिरव्या पालेभाज्या - पालक, मुळ्याचा पाला, कांद्याची पात, मेथी, २३. काकवी, २४. आले, २५. लिंबू, २६. पाचक - आले, लिंबू रस, सैंधव मीठ, २७. अभ्यंग स्नान, २८. व्यायाम - भरपूर | १. सुंठ |
फाल्गुन: | १. तैल मर्दन व गरम पाण्याने स्नान, २. गरम कपडे (रात्री), ३. सुती कपडे (दिवसा), ४. कच्च्या कवठाची चटणी, ५. पिकलेले कवठ (बियांसकट) व गूळ, ६. उसाचा ताजा रस (बर्फ न टाकता), आले, लिंबू घालून, ७. संत्री, ८. मोसंबी, ९. डाळिंब, १०. लिंबू, ११. बिब्ब्याच्या बोंडांची भाजी, १२. बेल व तुळशीच्या पानांचा काढा, १३. बेलाच्या पिकलेल्या फळांचा मुरंबा, १४. तूप, १५. लोणी, १६. तेलबियांची चटणी (तीळ, कारळे, जवस), १७. पालेभाज्या, १८. फळभाज्या | १. शिजवलेले कवठ, २. बाजरी, ३. गूळ |
प्रत्येक ऋतूमध्ये आपला आहार, विहार आणि व्यायाम कसा असावा याचे यथायोग्य दिग्दर्शन आपले सण करतात. थोडक्यात सांगायचे तर आपल्या सणांची वर्षभरातील योजना ही अत्यंत शास्त्रीय पद्धतीची आणि निसर्गस्नेही आहे. असो हा अत्यंत सखोल अभ्यासाचा पण सहज समजणारा विषय आहे. यासाठी अधिक माहिती मिळविण्याची सुरुवात म्हणून खालील ‘संदर्भ’ विभागातील पुस्तके विशेषतः ‘देणं निसर्गाचं – रक्षण आरोग्याचं‘ हे पुस्तक वाचावे.
एकंदरीत, या सर्व गोष्टींचे चिंतन, मनन केल्यास खालील चित्र आपल्या डोळ्यापुढे आल्याशिवाय राहणार नाही. सर्वांच्या हे लक्षात येईल की जीवनशैली मानवकेंद्रित (Anthropocentric/Humancentric) न ठेवता ती पर्यावरणकेंद्रित अथवा निसर्गकेंद्रित (Ecocentric) – पर्यावरणस्नेही, पर्यावरणपूरक आणि आरोग्यपूरक कशी ठेवायची याचे धडे हजारो वर्षांपासून पिढी-दर-पिढी कृती व भक्तीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आपल्याला देत आहे. त्यातून कृतज्ञता आणि विनम्रता आपोआप रुजत होती. त्यातून जैवविविधतेचे जतनही होत आले आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीशी सहजीवनाचा आणि परस्परावलंबनाचा इतका खोलवर विचार आणि व्यावहारिक परिपाठ भारतीय संस्कृती सोडून आणखी कुठेही मिळत नाही. निसर्गाच्या संवर्धनासाठी तुम्हाला विशेष वेगळे काही करण्याची गरज नाही – विचार आणि शहाणपण अंगभूतच आहे. परंतु आपण आपल्या संस्कृतीकडे ‘कुठे ते जुनाट विचार ऐकायचे’ असे म्हणून पाश्चिमात्य पुरस्कृत शहरी जीवनशैलीच्या मागे धावत आहोत.
आता वेळ हातातून निघून चालली आहे, थोडे थांबून शांतपणे विचार करूया. आपण वाट चुकलोय हे लक्षात आले तरच वाट सुधारता येईल.
चित्र: भारतीय परिपक्व जीवनशैली चक्र
टीप: वरील चित्र राज्यनिहाय प्रादेशिक प्रतिनिधित्व करत नाही तर ते ऋतूनिहाय हंगामी प्रतिनिधित्व अंशत्वाने करते..
संदर्भ:
१. आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास: ऋग्वेदी; प्रकाशक: प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई, जि. सातारा
२. देणं निसर्गाचं – रक्षण आरोग्याचं: सौ. पौर्णिमा दिलीप कुलकर्णी; प्रकाशक: संतुलन प्रकाशन
३. संपूर्ण चातुर्मास: अ. ल. भागवतांनी सांगितलेली व्रते, उपासना व साधना यांच्यासह; प्रकाशक: राजेश प्रकाशन, पुणे
४. धार्मिक उत्सव आणि व्रते यामागील शास्त्र: पू. डॉ. श्री. जयंत आठवले, पू. श्री. संदीप आळशी; प्रकाशक: सनातन भारतीय संस्कृती संस्था
५. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र: पू. डॉ. श्री. जयंत आठवले, पू. श्री. संदीप आळशी; प्रकाशक: सनातन भारतीय संस्कृती संस्था
६. वृक्षसूची: महाराष्ट्र राज्य
ही पुस्तके वाचलीच पाहिजेत:
नोंद: कृपया नोंद घ्यावी की या लेखाचा हेतू भारतीय सण कसे साजरे करावे हे सांगणे नाही तर सामाजिक समन्वयाबरोबरच निसर्गाशी समन्वय आणि सहजीवनासाठी त्यांचे प्रयोजन किती सहज रीतीने केले आहे याची सर्वाना आठवण करून देणे हा आहे. त्यामुळे वाचकांनी पुढे येऊन या संदर्भातील विविध ग्रंथांचा अभ्यास करावा. याची सुरुवात वर दिलेल्या ‘संदर्भ’ विभागातील पुस्तकांनी होऊ शकते.
या लेखासाठी बहुमूल्य योगदान:
१. सौ. वसुधा सुभाष अत्रे (सणांसंदर्भातील माहिती)
२. श्रीमती शुभांगी कुलकर्णी (सणांसंदर्भातील माहिती)
३. श्री. बाबासाहेब म्हस्के (चित्र: भारतीय परिपक्व जीवनशैली चक्र)
४. श्री. सुशील वंजारी (तंत्रज्ञान)
५. श्री. चैतन्य कुलकर्णी (तंत्रज्ञान)
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसाच्या निमित्ताने प्रकाशित.
चित्र स्रोत: flickr, Vanarambh
हे सुद्धा वाचा: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १, भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग २, ऋतुचक्र