विद्युत वाहन शाप की वरदान?
आजकाल प्रत्येक कुटुंबाला आणि कुटुंबातील प्रत्येकाला विद्युत वाहने बाळगणे ही एक विशेष गोष्ट वाटू लागली आहे. यामागची प्रमुख कारणे म्हणजे पेट्रोल / डिझेल वर खर्च करावा लागणार नाही आणि ती वाहने पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत असा झालेला समज. आपण जर सहजच गुगल केले तर ९०% संकेत स्थळे विद्युत वाहनांचे फायदे आणि खासियतच सांगतात.
काही ठळक जाहिरात केलेले फायदे खालील प्रमाणे
- कमी परिचालन खर्च
- कमी देखभाल खर्च
- कमी प्रदूषण
- कर आणि आर्थिक सवलती
- जीवाश्म इंधने पर्यावरणाचा ऱ्हास करत आहेत. विद्युत वाहने मात्र त्यांचा वापर करत नाहीत.
- सोपा आणि शांत प्रवास
- घरच्या घरीच चार्जिंग
- ध्वनी प्रदूषणापासून सुटका
पण विद्युत वाहने खरेदी करताना काही मुद्दे लक्षात घेणे गरजेचे आहे
- विजेची निर्मिती बऱ्यापैकी जीवाश्म इंधनातूनच होते.
- सर्व विद्युत वाहने, त्यांच्या भागांची निर्मिती, पुरवठा आणि त्यांच्या पुनर्वापराची समस्या यामुळे कार्बन उत्सर्जनासाठी आयुष्यभर जबाबदार असतात.
- निकेल, मॅगनीज, कोबाल्ट, लिथियम आणि ग्रॅफाइट साठी मोठ्या प्रमाणावर खाणी खोदल्या जात आहेत.
- खराब झालेल्या बॅटरी बदलण्याची किंमत कारच्या किंमतीच्या जवळपास ६०% ते ७०% आहे.
- खराब झालेल्या बॅटरीच्या विल्हेवाटीचा प्रश्न.
विद्युत वाहने जीवाश्म इंधन आधारित वाहनांइतकीच प्रदूषण करतात का? ह्या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी सापडणारे नाही. थोडक्यात निष्कर्ष काढायचा म्हटला तर, जर शाश्वत उत्पादन, औद्योगिक प्रक्रिया आणि तंत्रज्ञान, विद्युत वाहनाचे कार्बन प्रदूषण कमी करणायास वापरले गेले तरच विद्युत वाहने एक आशादायक मार्ग ठरू शकतील.
अभ्यासक: परेश राणे
हे सुद्धा वाचा: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग १
टीप: कृपया नोंद घ्या की वरील माहिती विद्युत वाहनाच्या जीवनचक्राच्या विविध टप्प्यांच्या आकलनावर आधारित आहे. उल्लेखित संदर्भ हा त्रयस्थ संस्थेचा आहे आणि आमचा त्या संस्थेशी कोणताही संबंध नाही.
मुख्यचित्र स्रोत: Vanarambh®