जर आपण १ महापद्म झाडे लावली तर आपण हवामान बदल थांबवू शकतो का?
झाडे आपल्याला हवामान बदलापासून खरंच वाचवू शकतात का? अनेक युगांपासून, कर्बवायूची पातळी नियंत्रणाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी निसर्ग प्रकाशसंश्लेषणासारख्या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. परंतु आपण हवेत अधिक कर्बवायू सोडून, तो कार्बन शोषून घेण्यासाठी आवश्यक असलेली अनेक जंगलेही आपण कापली आहेत. आता वाचण्यासाठी #TeamTrees सारखे मोठे वृक्षारोपण उपक्रम हवे आहेत , बरोबर? खरं तर, आपण यापेक्षा व्यापक विचार केला पाहिजे. हवामानातील बदलांचे निराकरण करण्यासाठी वृक्ष आपल्याला खरोखरच मदत करू शकतात असे चार मार्ग येथे आहेत – १ महापद्म (१ ट्रिलियन) झाडे लावू इच्छिणार्या व्यक्तीपासून, ते आपल्याकडे असलेली जंगले कशी वाचवता येतील, ते आपण स्वतः सक्रियपणे प्रदूषण कमी करणे, ते झाडे प्रदूषण नियंत्रणात आणखी प्रभावी बनवण्यासाठी जीवशास्त्र शास्त्रज्ञ काय प्रयत्न करत आहेत इथपर्यंत.
नोंद: या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या पर्यायांपैकी “हॅकिंग ट्री बायोलॉजी” या पर्यायाशी वनारंभ सहमत नाही किंवा त्याचे समर्थन करत नाही. नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेच्या कार्यामध्ये मानवाने केलेले कोणतेही बदल, अल्पकालीन फायद्याचे असू शकतात परंतु ते दीर्घकाळासाठी घातकच ठरतात.
हे देखील वाचा: आपली जंगलं वाचवा
हे देखील पहा: झाडे एकमेकांशी कशी बोलतात, जैवविविधता इतकी महत्त्वाची का आहे?, शहरांना झाडे का हवी आहेत?, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, हवामानातील बदलामुळे WET-BULB (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक, एका जंगलाची गाथा: इकोलॉजिकल सोसायटीचा पश्चिम घाटावरील लघुपट
व्हिडिओ श्रेय: Be Smart
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.