कोण होते मारुती चितमपल्ली?
३६ वर्ष वन खात्यात सेवा. त्या काळात देशभर भटकंती. जवळपास ५ लाख किलोमीटरचा प्रवास. १३ भाषांचं ज्ञान. आदिवासी आणि इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि ३० वर्ष जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या. त्याआधारे पक्षिकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचं लेखन. वन्यजीवनावर आधारित २५ पुस्तकं. एवढं सगळं कार्य एकाच जीवनात करणारे अरण्यऋषी म्हणजे मारुती चित्तमपल्ली.
बुधवार १८ जूनला चित्तमपल्ली यांचं वयाच्या ९३व्या वर्षी सोलापूर इथं निधन झालं.
वन्यजीव अभ्यासक, एक प्रतिभावंत लेखक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि आपलं संपूर्ण जीवन वनविद्येचा अभ्यास करण्यासाठी घालवणारे संशोधक अशी मारुती चित्तमपल्ली यांची ओळख. त्यांना नुकतंच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मुळचे सोलापूरचे असूनही त्यांनी आपलं अख्खं आयुष्य विदर्भातल्या जंगलांमध्ये घालवलं होतं. आपल्या अखेरच्या काळातही त्यांना तिथून परतायचं नव्हतं. पण प्रकृती अस्वस्थतेमुळं ते आपल्या मूळगावी परतले होते. मारुती चित्तमपल्ली यांच्या जीवनावर आणि या सगळ्या कार्यावर प्रकाश टाकणारा तसंच त्यांच्या जीवनातले काही रोचक किस्से सांगणारा हा व्हिडिओ.
हे देखील पहा: ‘अरण्यऋषी’ श्री. मारुती चितमपल्ली, यशाच्या गावी जाता जाता – श्री. किरण पुरंदरे
हे देखील वाचा: वनारंभ निसर्गशाळा, रानवाटा, निसर्गवाचन
व्हिडिओ श्रेय: BolBhidu
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.