मुलं बुद्धिवंत, संस्कृतीशी नाळ घट्ट जोडलेली आणि मनोबलवान कशी बनवायची? – इंदुताई काटदरे
या विचारप्रवर्तक भागात आपण इंदुताई काटदरे – एक शिक्षिका, विचारवंत आणि भारताच्या सांस्कृतिक मूल्यांची ध्वजवाहिका – यांना भेटणार आहोत, ज्यांच्याबरोबर आपण आपल्या शिक्षणप्रणालीत काय चुकलं आणि ते कसे दुरुस्त करता येईल यावर उहापोह करणार आहोत.
यामध्ये त्या आपणास प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या प्रवासावर घेऊन जातात, जिथे शिक्षण म्हणजे फक्त गुण किंवा पदवी मिळविणे एवढ्यापुरते मर्यादित नव्हते, तर चारित्र्य घडविणे, मनोबल वाढवणे आणि धर्मभावना पक्की करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट होते. आजच्या शाळांमध्ये बहुतेक वेळा मुलं विस्कळीत आणि चिंताग्रस्त बनून जातात, तर गुरुकुल पद्धती जीवनाच्या वास्तवावर आणि आपल्या भूमीच्या मूल्यांवर आधारित होती.
इंदुताई मैकॉलेच्या वारशाचा आपल्याला असलेला धोका, सांस्कृतिक मूल्यांचा ह्रास याबद्दल बोलतात, आणि आपल्याला आपल्या मूळ तत्वांकडे परत जाणे ही निवड नव्हे, तर ती आजची गरज का झाली आहे, हे स्पष्ट करतात. त्या घर ही मुलांची पहिली शाळा कशी असते, कथा-कथन आणि मातृभाषेतले शिक्षण मुलांच्या जगाबद्दलचा दृष्टिकोन कसा घडवते, आणि पालक आपल्या मुलांना मजबूत नैतिक आणि सांस्कृतिक पाया देऊन कसे वाढवू शकतात, याबद्दल सविस्तर सांगतात.
जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की आपल्या मुलांच्या संगोपनात आणि शिक्षणात काही तरी कमी आहे, तर हा परिसंवाद आपल्याला स्पष्टता, अंतर्दृष्टी आणि पुढचा मार्ग दाखवेल हे नक्की.
व्हिडिओ श्रेय: Prachyam
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.