वृक्षकोष
प्रत्येकाच्या मनात नेहमीच एक प्रश्न येतो – उपलब्ध जागेत मी कोणती झाडे लावावीत? एक चांगला माळी सुद्धा कधीकधी आपल्या या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यात अयशस्वी होतो. खाली स्थानानुसार वनस्पतींची यादी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. कृपया नोंद घ्यावी की ही यादी उपलब्ध जागेत कोणती देशी झाडे लावू शकतो याबद्दल मूलभूत कल्पना देण्यासाठी आहे. येथे बरेच वृक्ष, झुडुपे, भाजीपाला आणि औषधी वनस्पती अद्याप खाली सूचीबद्ध नाहीत. यथावकाश ती येतीलच.
आम्ही येथे सर्व याद्या आणि संबंधित माहिती अद्ययावत करत राहू.
सज्जातील (बाल्कनी) झाडे
तुळस, ब्राम्ही, शतावरी, आले, हळद, चाकवत, पालक, माठ, आंबटचूका, अळू, करडई, अंबाडी, घोळ, मुळा, सुरण, बीट, ओवा, कोथिंबीर, कांदा, लसूण, कुंती, कनकचंपा, वाळा, गवती चहा, वेखंड, अडूळसा
निम्नसावलीत वाढणारी झाडे
अळू* ( शोभेचा), अल्पिनिया*, बेगोनिया *, बर्ड ऑफ पॅराडाईस*, फर्न*, हळद*, हेलीकोनिया*, कुमुद (वॉटर लिली), नागफणी*, नागवेल / विडा*, नेवाळी, पुदिना*, सोनटक्का*, तेरडा, आले*, काळी मिरी*, कोष्ट कोलींजन*, मंडूकपर्णी, मंजिष्ठ, मरवा*, मायाळू*, पिंपळी
गच्चीवरील झाडे
तुळस, ब्राम्ही, शतावरी, आले, हळद, चाकवत, पालक, माठ, आंबटचूका, अळू, करडई, अंबाडी, घोळ, मुळा, सुरण, बीट, ओवा, कोथिंबीर, कांदा, लसूण, कुंती, कनकचंपा, वाळा, गवती चहा, वेखंड, अडूळसा, वाळा, गवती चहा, वेखंड, अडूळसा, कढीपत्ता, दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ, घोसाळे, दोडका, कारले, कोहळा, काकडी, तोंडली, टिंडा, ढेमसे, करटोली, भेंडी, वांगे, ढोबळी मिरची, गवार, घेवडा, पत्ताकोबी, फुलवर
भिंतीजवळची झाडे
पारिजातक, कुंती, निरगुडी, बकुळ, सोनचाफा, आपटा
बंगला / शेतघराजवळील झाडे
कवठ, बोर, जांभूळ, चाफा, पारिजातक, आंबा, पेरु, चिकू, पळस, पांगारा, कडूनिंब, बकुळ, पुत्रंजीव, कदंब, सातवीण (सप्तपर्णी), हिरडा, बेहडा, आवळा, टेटू, शिवण, बीजा, उंबर, पपई, संत्री, मोसंबी, शेवगा, कढीपत्ता, लिंबू, केळी, सीताफळ, अंजीर, एरंड
उद्यान स्थपतींसाठी वेगाने वाढणारी झाडे
कदंब, भोकर, पांगारा, कांचन, बहावा, काटे सावर, शिरीष, किनई, सातवीण (सप्तपर्णी), बकान नीम, शेवगा, हादगा, पारिजातक, भेरली माड, बांबू
गृहरचना संस्था / कंपनी मोकळ्या जागेसाठी झाडे
कदंब, पळस, पांगारा, सीता-अशोक, अडूळसा, बेल, कुंती, पारिजातक, बहावा, कवठ, रतनगुंज, रोहितक, वावळ, वायवर्ण, शिवण, आपटा, कनकचंपा, भेरली माड, शिंदी, वारस, शिसम, तामण, बांबू
पुष्प सौंदर्ययुक्त झाडे
वायवर्ण, करमळ, पळस, बूच पांगारा, देव सावर, वारस, बीजा, फणशी, टेटू, सुरंगी, मोह, सीता-अशोक, पाटल
पर्णशोभीवंत झाडे
नांद्रूक, उंडी, सालई, कळम, जंगली बदाम, कुसुंब, शिंदी, अर्जुन, जांभूळ, वावळ
हिरवळीसाठी झाडे
दूर्वा, मंडूकपर्णी
नैसर्गिक कुंपणासाठी झाडे
निरगुडी, कारवी, अडूळसा, मेंदी, निवडूंग, सागरगोटा, कुंती, बांबू, करवंद
शेतीच्या बांधावरील झाडे
पेरु, पपई, संत्री, मोसंबी, जांभूळ, शेवगा, कढीपत्ता, लिंबू, केळी, सीताफळ, अंजीर, एरंड, बोर, चिकू
उद्यानांसाठी झाडे
पळस, पांगारा, अर्जुन, शिसम, काटे सावर, जंगली बदाम, शिरीष, तामण, कांचन, उंबर, सीता-अशोक, सातवीण (सप्तपर्णी), बेल, कुंती, बकान नीम, बहावा, कवठ, करमळ, रतनगुंज, रोहितक, वावळ, वायवर्ण, शिवण, आपटा, कनकचंपा, किनई, टेमरू, टेटू, परस पिंपळ, पुत्रंजीव, बकुळ, बुरगुंड, मुचकुंद, भोकर, शमी, कदंब, वारस, बांबू
रस्त्याकडेची झाडे
वड, पिंपळ, नांद्रूक, करंज, कडूनिंब, आंबा, बकुळ, भोकर, चिंच, कदंब, सीता-अशोक, सातवीण (सप्तपर्णी), बकान नीम, बहावा, रतनगुंज, रोहितक, वावळ, वायवर्ण, शिवण, आपटा, किनई, परस पिंपळ, भोकर, वारस
* हे चिन्ह म्हणजे काल्टीवेटेड / संकरीत केलेल्या / न पसरणाऱ्या (non-invasive) वनस्पति, ज्या तुम्ही नको असल्यास लावण्याचे टाळूही शकता.
देशी वृक्षांसाठी रोपवाटिका
- प्रांजल नर्सरी, औंध, पुणे
- एप्रेस गार्डन, घोरपडी, पुणे
सूचना
- वरील यादीमध्ये स्थानिक वनस्पती प्रजातींची सामान्यीकृत यादी आहे. आपल्या परिसराच्या आधारे, प्रथम आपल्या क्षेत्रात कोणती झाडे उगवत आहेत किंवा होती ते तपासा. त्यानुसार तेथे लावण्यासाठी त्या त्या प्रकारच्या प्रजाती निवडा. या सूचनेचे कारण असे आहे की, अभ्यासानुसार हे लक्षात आले आहे की, परिसरानुसार, प्रदेशानुसार अगदी एका राज्यात देखील प्रजाती बदलतात. आपण विचारशील आणि डोळस होऊ या.
- मोठे लॉन्स नाकारा. त्याऐवजी झुडुपे लावा.
- देशी (स्थानिक) नसलेल्या वनस्पती प्रजातींना नकार द्या. खरेदी करताना झाडाचे उत्पत्तिस्थान विचारा. जर विक्रेता जागरूक नसेल तर झाड खरेदी करू नका तर आधी त्याचे उत्पत्तिस्थान शोधा मग निर्णय घ्या.
- भाज्यांसह प्रत्येक वनस्पतीच्या देशी (स्थानिक) प्रजातींच्या बियांसाठी आग्रह धरा.
- विदेशी (स्थानिक नसलेली) वनस्पती लावणे स्थानिक सजीवांवर अन्याय आहे.
- गुलमोहर, नीलगिरी, सूरू, सिल्व्हर ओक, नीलमोहर ही विदेशी (स्थानिक नसलेली) झाडे नाकारा.
- आपण हजारो वर्षांच्या कालावधीत विकसित झालेल्या जंगलाशी स्पर्धा करू शकत नाही परंतु शक्य तितके देशी (स्थानिक) वैविध्य आपण साध्य करू शकतो.
- झाडावर आलेला प्रत्येक घास, प्रत्येक फळ हे फक्त माणसासाठी नाही तर निसर्गातील प्रत्येकासाठी आहे याची जाणीव मुलांमध्ये निर्माण करा.
अद्ययावत माहितीसाठी वरील यादीतील बदलांवर लक्ष ठेवा.