Email: [email protected]    Website Language: English / मराठी

आरोग्य पाण्याचे

विचार वैश्विक - कृती स्थानिक - प्रतिसाद वैयक्तिक!
22
Mar

आरोग्य पाण्याचे

रविवारचा दिवस होता. सुट्टीचा आनंद घ्यावा म्हणून आज उशीरा उठायचं ठरवल होतं. बराच वेळ अंथरुणात लोळत पडल्यावर निवांतपणे उन वर आल्यावर उठलो. उठल्याउठल्या पहिली जाणीव ही झाली की खूप जोराची तहान लागली आहे. वॉटर प्युरिफायर चालू करायचं विसरल्यामुळे पाणी संपलं होतं. आज थेट नळाच पाणी पिऊन बघावं असं ठरवलं. भरला ग्लास आणि लावला तोंडाला. तृप्त झाल्या सारख वाटलं. नकळत मनात विचार आला की जर असं अमृतासारखं पाणी मिळालेच नाही तर काय होईल?

मी ज्या शहरात राहतो त्या शहराला कधी पाणीटंचाईचा सामना करावा लागेल का? असा प्रश्न मला पडला होता. थोडा वेळ गुगल सर्च केले आणि कळले की चेन्नईच्या दक्षिणेकडील शहरात गंभीर पाणी टंचाईमुळे क्रिकेटर केएल राहुलला शॉवरऐवजी बादलीने आंघोळ करावी लागली. (शॉवर खाली आंघोळ करणे म्हणजे पाण्याचा अपव्ययच) अरे देवा! मी अधिक गुगल केले आणि आश्चर्यकारक तथ्ये मला सापडत गेली. असे कळाले की माझ्या राहत्या घरापासून साधारण ५०-६० किलोमीटरवरच पाण्याचे दुर्भिक्ष आहे. म्हणजे शहरापासून साधारण पन्नास किलोमीटर दूर, फार काही अंतर नाही खरं. आपल्या इथे तर पाणी आहे त्यांना का मिळत नाही?

असा प्रश्न मनात आला. मग असा विचार केला की आपल्याला पाणी कुठून मिळते? आपल्याला तर आपण नदीवर बांधलेल्या धरणातून पाणी मिळतं. मग तीच नदी ते पन्नास किलोमीटर वरच्या लोकांना पाणी का नाही देत? हैराण झालो या प्रश्नाने. गुगल महाराजांच्या खूपच मागे लागलो याचे उत्तर शोधायला. इंटरनेटवर जीवीत नदी चे ब्लॉग सापडले. लक्षात आलं की आपण शहरातून सोडलेलं सगळं सांडपाणी त्या नदीत जाते कोणत्याही प्रकारचं प्रोसेसिंग न करता. म्हणजे थोडक्यात ती नदी सांडपाण्याची बनवली आहे, आपल्या शहरानं तर. थोडासा अभ्यास केल्यानंतर हे लक्षात आलं की ७० टक्के नदी प्रदूषणला घरगुती वापरातून आलेलं सांडपाणी जबाबदार आहे. आपण फरशी पुसायला, संडास धुवायला, भांडी घासायला जे साबण वापरतो ते अतिशय घातक रसायने आपल्या घरात आणि पर्यायाने नदीत सोडतात. सर्व प्रदूषण आपल्या घरात जे तिथे डोळ्यांना दिसत नाही पण संपूर्ण शहराची रसायने एकत्र झाल्यानंतर त्याचं खरं आणि विद्रूप रुप नदीमध्ये दिसतं.

तरीही असे घातक साबण व रसायने आपण का वापरतो? आज जी परिस्थिती ५०-६० किलोमीटरवरच्या लोकांवर आहे ती शहरात राहणाऱ्यांवर यायला असा कितीसा वेळ लागेल? स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखं आपलं वागणं बेजबाबदार आहे हे लक्षात आलं. 

चहा टाकला व या घातक साबणांना आणि डिटर्जेन्ट्सना काही पर्यावरण पूरक पर्याय आहे का हे शोधण्याचं हाती घेतलं. ट्युरील सारखे काही पर्याय सापडले. आपण वापरणाऱ्या घातक साबणाच्या एवढीच किंमत असणारे हे पर्यावरण पूरक साबण आपण का वापरत नाही हे मला कळेचना. हे पर्याय सहज ऑनलाइन उपलब्ध पण आहेत, अगदी ॲमेझॉन वर सुद्धा. Do It Yourself चे सुद्धा भरपूर पर्याय उपलब्ध आहेत, जसे की, विषमुक्त जीवन शैली. माझ्या मनात एक प्रश्न आला, आपण हे पर्याय का वापरत नाही जे जास्त सुरक्षित आहेत?

चहा संपवता संपवता ऑनलाईन ऑर्डर दिली अन् असं ठरवलं की आता हे पर्यावरण पूरक साबण वापरुन बघायचे. आपल्याला जर आवडले तर आपल्या मित्रपरिवारमध्ये सर्वांना आग्रह धरायचा की एकदा तरी हे वापरून पहा.

स्वतःला आणि इतरांनाही कायम अमृतासारखे पाणी मिळत रहावे यासाठी नद्या स्वच्छ व वाहत्या करण्याच्या दिशेने आपलं स्वतःचं एक तरी छोटं पाऊल टाकावं असं ठरवून रविवार सुफळ केला.

 

टीप: हा लघुलेख कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी नाही अथवा येथे उल्लेख केलेल्या कोणत्याही उत्पादनाच्या विक्रीशी आमचा संबंध नाही. आम्हाला मिळालेली माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हा यामागील अत्यंत प्रामाणिक हेतू आहे. वाचकांनी स्वतः पडताळणी करून कोणतेही उत्पादन वापरावे ही विनंती.

अभ्यासक: सचिन अत्रे
चित्र श्रेय: cawater-info.net

हे देखील पहा: आपलं पाणी वाचवा

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...