The Secret Network of Nature
आपणास माहित आहे का की झाडे ढग बनवू शकतात?
किंवा लांडग्यांच्या संख्येतील बदल नदीचा प्रवाह बदलू शकतो?
किंवा गांडुळे रानडुकरांना दिशेचे ज्ञान देतात?
नैसर्गिक जग गुंतागुंतीच्या संबंधांचे एक जाळे आहे, त्यांकडे माणूस दुर्लक्ष करतो. परंतु हे दुवेच निसर्गाचे सूक्ष्म संतुलन राखून ठेवतात आणि त्यातील एखाद्या छोट्याशा घटकालादेखील डिवचल्यामुळे साखळी प्रतिक्रिया निर्माण होऊन ती संपूर्ण पर्यावरणावर दुष्परिणाम करते.
या पुस्तकात, एक वनपाल आणि लेखक असलेले पीटर वोहलेबेन निसर्गातील आश्चर्यकारक दुवे आणि असंभवनीय वाटाव्या अशा भागीदाऱ्यांकडे आपले लक्ष वेधतात. वेगवेगळे प्राणी, झाडे, नद्या, खडक आणि हवामान प्रणाली कसे सहकार्य करतात, आणि या नाजूक यंत्रणेचे संतुलन बिघडले तर काय होते ते यात वाचायला मिळते.
All animals and plants are part of a delicate equilibrium, and every entity has its purpose and role in its ecosystem. The more we acknowledge that even the smallest disturbance can lead to unpredictable changes, the stronger the arguments for protecting larger areas of the environment. – Peter Wohlleben, Forester and Author