चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची
जवळजवळ प्रत्येकजण, बालपणात रात्रीच्या आकाशाकडे पाहणे सुरू करतो ते एकतर या गाण्याच्या तालावर नाचत किंवा हे गाणं गुणगुणत. अमर्याद आणि असंख्य दिवे लागलेलं आकाश ही आपली त्याच्याशी झालेली पहिली ओळख.
मंगळवार, दि. २५ मे २०२१; पौर्णिमेच्या च्या निमित्ताने, हा लघुलेख आपल्यासाठी तीच सुंदर कविता वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि रात्रीच्या आकाशाचा आनंद घेण्यासाठी घेऊन येत आहे…स्वच्छ आकाशाच्या शुभेच्छा!
या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची
आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती कुठल्या मोठ्या मौजात
हसुनी चांदण्या करीती किलबिल अपुल्या इवल्या डोळ्यांची… चला मुलांनो
द्वितीयेपासून रोजची येती गुरुजी उशिरा शाळेत
मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत
कधी वर्गातून पळते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची… चला मुलांनो
कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे
रागाने मग मंगळवेडा गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ ताऱ्यांची… चला मुलांनो
कधी वेळेवर केव्हा उशिरा, अवसेला तर पूर्ण रजा
राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा करिती ना सजा
असे मिळाया गुरुजी आम्हा करु प्रार्थना देवाची… चला मुलांनो
गीत – शांताराम नांदगावकर
संगीत – अशोक पत्की
स्वर – वैशाली जोशी
गीत प्रकार – बालगीत
टीप: ॲमेझॉन म्युझिक वरील उपरोक्त लिंक हे गृहित धरून दिली आहे की बहुतांश लोक amazon.in आणि अॅमेझॉन प्राइम वापरतात ज्यामुळे त्यांना संपूर्ण गाणे ऐकता येईल.