Email: [email protected]    Website Language: English / मराठी

वृक्षवल्ली आह्मां सोयरीं ...

निसर्गाचे महत्व आणि त्यातून मिळणारी प्रेरणा सर्वात सोप्या शब्दांत
25
Jul

वृक्षवल्ली आह्मां सोयरीं …

वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें।
पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुणदोष अंगा येत ॥२॥

आकाश मंडप पृथिवी आसन।
रमे तेथे मन क्रीडा करूं ॥३॥

कंथा कमंडलू देह उपचारा |
जाणवितो वारा अवसरू ॥४॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥

तुका म्हणे होय मनासी संवाद।
आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥

                     – संत तुकाराम

भावार्थ:

• या वनामध्ये अनेक प्रकारचे वेल, वृक्ष, प्राणी आणि सुस्वर स्वराने देवाला आळविणारे पक्षी, हे आमचे सगे सोयरे बनले आहेत. ॥१॥

• हे सुख निसर्गरम्य वनामध्ये आहे. म्हणून आम्हाला वनातील एकांतवास आवडतो. तसेच गुण दोष बोलणारे लोक येथे नसल्यामुळे गुणदोष चिकटत नाहीत. ॥२॥

• आम्हाला आकाश हे मंचाप्रमाणे असून पृथ्वी हे बसण्याचे आसन आहे. इथे बसून मन आनंदाची क्रीडा करते. ॥३॥

• देहाच्या उपचारासाठी गोधडी आहे आणि पाण्यासाठी कमंडलू आहे. वाहणाऱ्या वाऱ्यावरून आम्हाला वेळेचे ज्ञान प्राप्त होते. ॥४॥

• याठिकाणी आमच्या भोजनात हरिकथा असून आम्ही तिचे नानाप्रकार करून अत्यंत आवडीने सेवन करतो. ॥५॥

• तुकाराममहाराज म्हणतात, एकांतामध्ये आम्ही आमच्या मनाशी संवाद करतो. वादविवाद देखील मनाचा मनाशी होत असतो. ॥६॥

संदर्भ:
श्री संत तुकाराम महाराजांची सार्थ अभंगगाथा
वै. जोगमहाराज सांप्रदायिक

निसर्गाचे महत्व आणि त्यातून माणसाला मिळणारी प्रेरणा यापेक्षा थोडक्यात आणि सहज सोप्या भाषेत समजावता येईल का?

हे सुद्धा वाचा: भारतीय संस्कृती आणि निसर्ग – भाग २

Share To:

2 Responses

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...