Email: [email protected]    Website Language: English / मराठी

हुन्नरशाळा एक शोध, भुजचे स्थानिक गतिविधि केंद्र

पर्यावरणपूरक बांधकाम तंत्रज्ञानाचा प्रचार समाजाला सहभागी करून त्याच्या उत्थानासाठी आणि सक्षमीकरणासाठी.
01
Aug

हुन्नरशाळा एक शोध, भुजचे स्थानिक गतिविधि केंद्र

टीप: व्हिडिओ इंग्रजी मध्ये असल्यामुळे मराठी वाचकांना समजण्यास आणखी सोपे जावे म्हणून इथे भाषांतर देत आहोत.

कच्छ, भारतातील गुजरातमधील सर्वात मोठा जिल्हा, त्याची पारंपारिक आणि वारसा राजधानी भुज आहे, हे शहर महाराजा लखपतसिंहजींच्या आश्रयाने विकसित झाले. भुज हे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे ज्यामध्ये वास्तुकला समृद्ध भाषेसह विकसित झाली आहे. सपाट भूभाग पूर्णपणे नापीक असलेली जमीन, परिघात छोट्या टेकड्या असलेले भुजियो डुंगर म्हणून ओळखले जात होते. तिथं क्वचितच कुठली वनस्पती दिसते आणि आजूबाजूला आपल्याला निवडुंग आणि बाभळीची झाडं सापडतात. या प्रदेशात पाण्याची टंचाई आहे आणि इथे अनेकदा वालुकामय वावटळींचा फटका बसतो.

कच्छ हे मध्य पूर्व आणि मध्य आशियामधून स्थलांतरित झालेल्या अहिर, मतवा, रबारी आणि मालधारी यांसारख्या विविध जमातींचे निवासस्थान आहे, ते मुख्यतः गुरेढोरे पाळण्यात गुंतलेले आहेत आणि गोलाकार कामचलाऊ तंबूंच्या वाड्यांमध्ये राहतात. या तात्पुरत्या वास्तूंचे रूपांतर कायमस्वरूपी वास्तूंमध्ये केले जाते जे ‘भुंगा’ म्हणून ओळखले जातात, कच्छमध्ये आढळणाऱ्या घरांचे सर्वात पारंपारिक स्वरूप. तरी तेथे, आपल्याला दोन्ही प्रकारची म्हणजे पारंपारिक प्रकारची घरे त्याचबरोबर आधुनिक सुविधांसह समकालीन आणि रॅम्ड अर्थ कंस्ट्रक्शन यासारख्या पारंपारिक तंत्राने बांधलेली घरे पाहायला मिळतात आणि त्यामुळे ते अनुभवाच्या दृष्टीने अद्वितीय बनतात.

भुजची आमची अभ्यास सहल मुख्यतः हुन्नरशाळा येथे मातीचे तंत्रज्ञान शिकण्यावर केंद्रित होती ज्यात रुद्रमाता, खम्मीर, एलएलडीसी यासारख्या काही स्थळांच्या भेटींचा समावेश होता. माती बांधकाम तंत्र शिकण्यासाठी, आम्हाला कार्यशाळेत प्रात्यक्षिके करायला मिळाली, जे काम करण्यासारखे होते. यामुळे आम्हाला सामग्रीचे पूर्ण परीक्षण करून तिचा कमकुवतपणा आणि सामर्थ्य समजून घेण्याची संधी मिळाली.

रुद्रमाता, एक दुर्गम वस्ती जिथून कर्कवृत्त जाते तेथे एक समुदाय आहे, भूकंपात त्यांच्या घरांचे नुकसान झाले आणि त्यांना सरकारने येथे हलवले. सरकार आणि काही स्वयंसेवी संस्था आणि हुन्नरशाळा सारख्या इतर ना-नफा संस्थांनी या नवीन ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सक्रियपणे पुढाकार घेतला, जिथे त्यांनी स्वतःची घरे बांधली. ही घरे लाकडी चौकटीअसलेली गोलाकार आणि शाकारलेली होती. भिंतींचे सुशोभीकरण लहान आरसे वेगवेगळ्या आकृतीबंधांत चिटकवून केले होते, ते पडणारा सूर्याचा प्रकाश परावर्तित करून सूर्यकिरणांना घरात प्रवेश करण्यापासून परावृत्त करू शकतात. ही घरे भुजोडीतील घरांपेक्षा खूप वेगळी आहेत, भुजोडीमध्ये सामान्य विटांची घरे आहेत. आणि व्हिला हाऊसिंगमधील घरांमध्ये लोड बेअरिंगच्या (भारवाहू) भिंती आणि कौलं ठेवण्यासाठी लाकडी चौकट असते.

हुन्नरशाळा हे आमच्या अभ्यास सहलीचे प्रमुख केंद्रस्थान होते कारण सर्व गोष्टी त्याच्याशी निगडीत होत्या.

‘हुन्नरशाला फाउंडेशन’ ची स्थापना २००१ च्या भूकंपानंतर अभियान म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या अंतर्गत करण्यात आली आणि त्याची सुरुवात काही कारागीर, अभियंते, वास्तुविशारद यांच्या टीमने झाली, ज्यांनी स्थानिक पर्यावरणास अनुकूल सामग्रीसह विविध बांधकाम तंत्रे तयार केली, जी आम्हाला हुन्नरशाळा येथे पाहायला मिळाली, जिथे विविध प्रकारच्या साहित्य आणि तंत्राने इमारती बांधल्या गेल्या आहेत अगदी पुनर्नवीनीकरण केलेल्या लाकडाच्या छतापासून ते वॅटल आणि डब आणि रॅम्ड अर्थच्या भिंती, प्लास्टरच्या कामासाठी वापरल्या जाणार्‍या चायना क्ले, आयपीएस किंवा टेराझो फ्लोअरपासून बनवलेल्या टेरेस ते घरांच्या मजलल्यांपर्यंत आणि CSEB च्या भिंती.

हुन्नरशाळेचे दोन विभाग आहेत, जिथे एक विभाग प्रशासकीय कामकाज आणि डिझाइनिंग कामासाठी नियोजिलेला आहे तर दुसरा विभाग कारीगरशाळा म्हणून ओळखला जातो, जिथे कारागिरांना मूलभूत बांधकाम कौशल्ये शिकवली जातात आणि त्यांना स्वतः बांधकाम करण्याची मुभा दिली जाते.

मातीच्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भुजमधील विविध भागातून माती कच्चा माल म्हणून आणून झाली. त्यांनी आम्हाला माती अनुभवण्यास आणि स्पर्श, वास, दृष्टी याद्वारे तिची भौतिक आणि रासायनिक वैशिष्ट्ये शोधण्यास शिकवले. त्यांनी आम्हाला तीन प्रकारच्या मातीतील फरक देखील समजावून दिला, म्हणजे वालुकामय, गाळयुक्त, चिकणमाती. नंतर उकळण्याची प्रक्रिया करून आपण मिश्रमातीतील वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचा वजनाच्या प्रमाणात अभ्यास करू शकतो. आम्ही अनुक्रमे रेव, वाळू, गाळ आणि चिकणमाती वेगळे करण्यासाठी २.१ मिमी, ७५ मायक्रॉन, २ मायक्रॉनच्या वेगवेगळ्या श्रेणीच्या चाळण्यांसह चाळणी चाचणी देखील घेतली.

वर्कशॉपचा पुढचा भाग म्हणजे रॅम्ड अर्थ बांधकाम तंत्र समजून घेणे ज्यामध्ये तेलाने ग्रीस केलेले प्लायवुड बोर्ड पसरून फॉर्मवर्कचे फिक्सिंग कसे केले जाते आणि बोर्ड योग्यस्थितीत ठेवण्यासाठी धातूच्या पट्ट्या आणि लॉकिंग चाव्या कशा वापरल्या होत्या हे समजून घेतले. गारगोटीची (वाळूच्या दगडाची) भुकटी, चिकणमाती, सिमेंट आणि वाळू ३:१:१ च्या प्रमाणात मिसळले गेले आणि इतर घटकांसह १५% प्रमाणात पाणी शिंपडले गेले. एकदा मिसळल्यानंतर, ते मिश्रण फॉर्मवर्क दरम्यान जड धोपटण्यांनी धोपटले (रॅम केले गेले). दगडाची भुकटी, दगडाची भुकटी मुख्य घटक बदलून, आम्ही रॅम्ड अर्थ भिंतींमध्ये विविध रंग तयार करू शकतो.

कच्छमध्ये, पुरुष बाह्य घडामोडींमध्ये गुंतलेले असतात, तर स्त्रिया घरीच राहून भरतकाम, हस्तकला, ​​दागिने बनवण्यासारख्या कामांमध्ये व्यस्त असतात, ज्याचा आम्ही लिव्हिंग अँड लर्निंग डिझाइन सेंटर (LLDC) मध्ये तपशीलवार अभ्यास करू शकलो. , जे या हस्तकलांचे संरक्षण करतात, कच्छच्या विविध जमातींच्या पारंपारिक भरतकामाला प्रोत्साहन देतात आणि महिलांना वैयक्तिक हस्तकला व्यक्ती म्हणून सक्षम करतात.

हे देखील पहा: मातीच्या घरांबद्दलचे गैरसमज मोडीत काढणे. तीच अधिक शाश्वत का आहेत!, श्री.राहुल देशपांडे यांचे पर्यावरणपूरक घर

हे देखील वाचा: पर्यावरणासाठी काम करणारे गट, संस्था

व्हिडिओ श्रेय: Vedant patel

टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...