Email: [email protected]    Website Language: English / मराठी

आकार जीवनाला - सूत्र गीत

होतो जरी विनाश म्हणती विकास त्याला । उलटेच सर्व दिसते तमसावृता मतीला ॥
02
Feb

आकार जीवनाला – सूत्र गीत

व्यक्ती, समाज, सृष्टी
हित सर्व साधण्याला ।
उपभोग-संयमे द्या
आकार जीवनाला ॥

उपभोग साध्य जरि का
हानी तना-मनाची ।
व्याधी, तणाव बाधा
सुख- स्वास्थ्य लाभण्याला ॥

घाण्यास दोन बैल
पैसा अमाप वस्तू |
परि शांति वा न तुष्टी
घर पारखे सुखाला ||

संघर्ष, वैर, स्पर्धा
हिंसा तशी अनीती ।
व्यसने पुऱ्या समाजा
नेतात विकृतीला ॥

हो -हास संपदेचा
दूषीत सर्व सृष्टी ।
उत्पादनातिरेक
ढळवी तिच्याच तोला ॥

नाना जरी समस्या
रूपे नि स्तर विभिन्न ।
परि हाव हेचि कारण
त्यांच्याच उद्भवाला ॥

होतो जरी विनाश
म्हणती विकास त्याला ।
उलटेच सर्व दिसते
तमसावृता मतीला ॥

संकल्पनाच भ्रष्ट
दृष्टी नि ध्येय गैर ।
जगणेहि हो चुकीचे
ने सर्वही लयाला ||

जाणूनि वास्तवा ह्या
सारेच होउ सिद्ध ।
सम्यक् विचार कृतिने
कटिबद्ध पालटाला ॥

                                  – श्री दिलीप आणि सौ. पौर्णिमा कुलकर्णी

पुस्तक श्रवण:

श्रेय: श्री दिलीप आणि सौ. पौर्णिमा कुलकर्णी, निसर्गभान नाशिक

हे देखील वाचा: सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत…

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...