Email: [email protected]    Website Language: English / मराठी

सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत...

५ जून, जागतिक पर्यावरण दिवस
05
Jun

सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत…

सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत llधृ.ll
जमीन, पाणी, हवा सभोंती l
वृक्ष, वल्लरी, पक्षी गाती l
पशू, कृमी, जलचरे पोहती l
ह्या सर्वांचे मिळूनी बनते एकच जे सुव्यवस्थित ll१ll
ह्यात साखळ्या, चक्रे किति ही l
कर्ब, नत्र, जल, अन्नाचीही l
चक्रियता हा स्वभाव पाही l
दिसते ते ते चक्रांमध्ये सदैव की राहे फिरत ll२ll
परस्परांमधि सर्व गुंतले l
परस्परांवरी अवलंबुन रे l
परस्परांना पूरक सारे l
देणे-घेणे सदैव चाले परस्परां पोषक होत ll३ll
महत्व येथे प्रत्येकाला l
कुणी न येथे उपेक्षिलेला l
कार्य ठराविक ज्याचे त्याला l
स्थान आगळे प्रत्येकाचे दुज्यास ना घेता येत ll४ll
पार न येथे वैविध्याला l
माप न येथे सौंदर्याला l
मर्यादा परि संपत्तीला l
शतकांची ही ठेव रक्षिणे कर्तव्या स्मरूनी सतत ll५ll
नको काळिमा प्रदूषणाचा l
क्षय संपत्तीच्या ऱ्हासाचा l
भेद नको वा तो चक्रांचा l
शोषण नाही – पोषण व्हावे दोहनात आहे हीत ll६ll
संयम राहो उपभोगावर l
संरक्षण – कार्याला तत्पर l
संवर्धन – यत्नांस हातभर l
विचार वैश्विक करुनी स्थानिक कृतिला व्हावे संघटित ll७ll

                                  – श्री दिलीप कुलकर्णी

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...