12
Aug
अरे खोप्यामधी खोपा …
0 Comment
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला!
सुगरीण सुगरीण
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती मिये
गण्या गंप्या नर
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे माणसा!
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात, दहा बोटं
– बहिणाबाई
‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहरांचा हंडा आहे!’ - आचार्य अत्रे
हे सुद्धा वाचा: वृक्षवल्ली आह्मां सोयरीं…