हवामानातील बदलामुळे Wet-Bulb (आर्द्र-कंद) तापमान वाढ मानवी आरोग्याला हानीकारक
१ जुलै २०२१ रोजी दिल्लीत उष्णतेची लाट आली, जेव्हा कमाल तापमान 43.5 डिग्री सेल्सियस पर्यंत वाढले. त्याच वेळी, पश्चिम राजस्थानमधील गंगानगरमध्ये भारतातील सर्वाधिक तापमान ४४.५ डिग्री सेल्सियस नोंदवले गेले. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. हा मुद्दा सध्या जगभर गाजत आहे. परंतु जग केवळ उष्ण होत नाहीये तर अधिक आर्द्र किंवा दमट होत आहे.
एखादे ठिकाण किती उष्ण किंवा थंड आहे याचे वर्णन करण्यासाठी आपण सामान्यत: ड्राय-बल्ब (कोरडे-कंद) तापमानाचा विचार करतो. तथापि, हवामानाचा मानवी आरोग्य आणि क्रियाकलापांवर कसा परिणाम होईल याचे मूल्यांकन करण्यासाठी शास्त्रज्ञ आर्द्रता आणि इतर घटक विचारात घेण्यावर भर देत आहेत. आर्द्रता वेट-बल्ब (आर्द्र-कंद) तापमान म्हणून मोजली जाते. आर्द्रतेचाही उष्णतेसोबत विचार केल्याने, ज्याला उष्णता निर्देशांक म्हणतात, आपल्याला तापमान प्रत्यक्षात ‘कसे वाटते’ हे निर्धारित करण्यात मदत होते. तुमच्या मोबाईल फोन्स आणि अँप्समध्येही हे तुमच्या लक्षात आले असेल. उष्णतेसह आर्द्रता मानवी आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी घातक आहे. सध्या, एक घटना या उष्णता-आर्द्रता संतुलनाच्या माध्यमातून मानवी सहनशीलतेची कठोरपणे चाचणी करत आहे. ती म्हणजे हवामान बदल!
घामावर आधारित शीतकरण प्रणाली असलेल्या मानवांना, उष्णतेवर मात करण्यासाठी उत्तम प्रकारे डिझाइन केले गेले आहे. परंतु उष्णता आणि आर्द्रतेचची पातळी जीचा आपण सामना करू शकतो त्याला मर्यादा आहे. 35 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे आर्द्र-कंद तापमान किंवा WBT हे मानव हाताळू शकतील अशा आर्द्रतेची कमाल मर्यादा मानली जाते. यापलीकडे, शरीर घामावर आधारित प्रणाली वापरून स्वतःला प्रभावीपणे थंड करू शकणार नाही.
हे देखील पहा: गाया सिद्धांताचे स्पष्टीकरण, आपली पृथ्वी: सर्व सजीवांसाठीचे एक अभयारण्य, माणसाने फक्त स्वतःचाच विचार करावा का?
हे देखील वाचा: पर्यावरणासाठी काम करणारे गट, संस्था
व्हिडिओ श्रेय: Down To Earth
टीप: कृपया नोंद घ्यावी की वरील व्हिडिओ कोणत्याही प्रकारची जाहिरात किंवा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेस समर्थन देत नाहीत. व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पर्यावरणाचा संदेश पोहोचविणे हा आमचा एकमेव हेतू आहे. चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे.