Email: [email protected]    Website Language: English / मराठी

वाट माझ्या आजोळाची

बैठ्या आजोळच्या घरी, शिकवण नम्रतेची
08
Aug

वाट माझ्या आजोळाची

वाट माझ्या आजोळाची, बकुळीच्या सुवासाची,
तशी केळी, कर्दळीच्या, झुलत्या ग कमानीची

फुलवली आजोबांनी, बाग काजू- फणसाची,
आंबा-पोफळीच्या संगे, झुले मान नारळीची

वाऱ्यावर झोके घेई, साळी उभ्या शिवाराची,
लाल लाल शालीवर, नक्षी हिरव्या किनारीची

बैठ्या आजोळच्या घरी, शिकवण नम्रतेची,
सार-भातानेच होते, तृप्ती इथे पाहुण्यांची

शान सागराची न्यारी, खाण रत्नमाणकांची,
जाळ्यामध्ये गावलेली, दौलत ही गरिबाची

आजोळाच्या वाटेकडे, डोळे लागले लागले,
आठवांच्या ओलाव्याने, मन पुरते भिजले.

– रोहिणी पटवर्धन
(एप्रिल १९८३)

पुस्तक वाचन: किशोर मासिक

श्रेय: किशोर मासिक

हे देखील वाचा: सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत…, आकार जीवनाला – सूत्र गीत

Share To:

Leave a Reply

You are donating to : Greennature Foundation

How much would you like to donate?
$10 $20 $30
Would you like to make regular donations? I would like to make donation(s)
How many times would you like this to recur? (including this payment) *
Name *
Last Name *
Email *
Phone
Address
Additional Note
paypalstripe
Loading...