11
Aug
वाट
0 Comment
आटपाट
आजोळची वाट
वाटेवर झाडे
आंब्याची दाट
आंब्याची गोडी
माणसांच्या तोंडी
गोडगुलाबी
पाखरांच्या गोष्टी
पाखरांच्या कानी
झुळझुळ वाणी
वारा गातो
झऱ्यांची गाणी
वाऱ्याची शीळ
उन्हाळ्याचा थाट
पानांवर मोहोर
सुट्टीची वाट
– शंतनू हिरळकर
(एप्रिल १९९७)
पुस्तक वाचन: किशोर मासिक
श्रेय: किशोर मासिक
हे देखील वाचा: वाट माझ्या आजोळाची, सारे मिळूनी चला गाउया पर्यावरणाचे गीत…, आकार जीवनाला – सूत्र गीत